दिनांक १६ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
चेक न वठल्याच्या (बाउन्स) एका महत्त्वपूर्ण प्रकरणात कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) या संस्थेच्या बाजूने न्यायनिवाडा झाला आहे.

श्रीगोंदा येथील न्यायालयाने आरोपीस Negotiable Instruments Act (कलम १३८) अंतर्गत दोषी ठरवून सहा महिन्यांची साधी कैद आणि मोठी दंडाची रक्कम ठोठावली आहे.

तृतीय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती शिरसाठ मॅडम यांच्या न्यायालयाने दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी हा निकाल दिला. आरोपी बबन प्रधान शेंडगे (वय ४९, रा. गंधनवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) यास न्यायालयाने दोषी ठरवून खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे:

- साधी कैद: आरोपीस सहा महिन्यांची साधी कैद (Simple Imprisonment) ठोठावण्यात आली आहे.
- दंडाची रक्कम: आरोपीस ₹२,१७,४५१/- इतका दंड तात्काळ भरण्याचा आदेश देण्यात आला आहे.
- अतिरिक्त कैद: दंड न भरल्यास आरोपीस अतिरिक्त दीड महिन्याची साधी कैद भोगावी लागेल.
- भरपाई: दंडाची संपूर्ण रक्कम फिर्यादी कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड या संस्थेस भरपाई (Compensation) म्हणून देण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

सदर प्रकरणात फिर्यादी कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्या वतीने ॲड.पुरुषोत्तम जगन्नाथ फाटे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांच्या सखोल कायदेशीर मांडणीमुळे संस्थेच्या बाजूने न्यायनिवाडा झाला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
