दिनांक २ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदयाचे तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी(महाजन) यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नवीन तहसीलदार रुजू होण्यादरम्यान श्रीगोंदा तहसीलदार पदी प्रभारी म्हणून, चारुशीला पवार यांनी सूत्रे हाती घेतले. या कार्यकाळात पवार यांनी श्रीगोंदा तालुक्यातील विविध भागात अवैद्य वाळू व गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफिया व चोरांवर कारवाई करीत ही अवैद्य यंत्रणा थांबविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
दिनांक ११ ऑगस्ट २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधी दरम्यान ४ ठिकाणी अवैध वाळु उत्खनन केलेले साठे जप्त करुन ५,४६,०००/- इतका महसुल शासन जमा केलेला आहे. ४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ६,०६,०७१/- इतका दंड वसुल करण्यात आलेला आहे.
मौजे पेडगाव येथे अवैध वाळुउपसा करणा-या १० व्यक्तीविरोधात भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. दिनांक २०/०९/२०२० रोजी म्हसे येथील घोड नदीपात्रातुन १ वाहन अवैध वाळु वाहतुक करताना पकडण्यात आलेले आहे. सदर वाहनावर दंडात्मक कारवाई सुरु आहे. तसचे ३५ ब्रास अवैध वाळु साठ्याचा लिलाव करुन १,७५,०००/- इतकी रक्कम शासन जमा करण्यात आलेली आहे.
त्याचवेळी म्हसे येथील गट नंबर ३६९ मधून अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे आढळून आले. सदर गट हा घोड प्रकल्प धरण महाराष्ट्र शासन यांचे नावे आहे. सदर गटामधुन होत असलेल्या अवैध उत्खनन बाबत उपविभागीय अभियंता, घोड पाटबंधारे उपविभाग, शिरुर यांना जबाबदार धरुन कारवाई का करणेत येवु नये ? याबाबत पत्र देण्यात आलेले आहे. तसेच, या कार्यालयामार्फत अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक रोखणे कामी गस्ती पथकांची निर्मीती करण्यात आलेली आहे.
यापुढील काळात देखील अवैध वाळु उत्खनन/वाहतुक विरोधी कडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करताना आढळून आलेल्या यंत्रसामग्री वर म.ज.म. अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रभारी तहसिलदार श्रीगोंदा (चारुशिला पवार) यांनी माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(तहसील कार्यालय श्रीगोंदा)
