मांडवगण परिसरातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दुष्काळाचे भुत कायमचे बसले आहे. अशा परिस्थितीत रूईखेलचे माजी सरपंच बाळासाहेब तुळशीराम साठे यांनी राजकारणाला गुड बाय केली आणि टँकरने पाणी पुरवठा करून चार एकर डाळिंबाची बाग फुलविली आहे. या शेतीतून साठे यांना हिम्मत व आर्थिक ऊर्जा मिळाली आहे. बाळासाहेब साठे यांना जालिंदर हा एक भाऊ वडिलोपार्जित दीड एकर जमीन अशा परिस्थितीत एकत्रीत कुंटूबाची विभागणी झाली.
बाळासाहेब यांचा विवाह छायाबाई यांच्याशी झाला. त्यांना भिमाजी व अर्जुन ही दोन मुल झाली भिमाजी हा एस.आर.पी.त भरती अर्जुन हा पदवीधर झाला पण शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. सन २००० मध्ये बाळासाहेब साठे यांनी सात एकर जमीन खरेदी केली. त्याच वर्षी बाळासाहेब यांचा खांडगाव शिवारात अपघात झाला या अपघातातून त्यांचा पुनर्जन्म झाला . जीवन जगण्यासाठी पुन्हा लढाई सुरू झाली.
बाळासाहेब साठे यांनी डाळिंबाची लागवड करण्याचा मनोदय केला. शेतीतज्ञ रमेश हिरवे यांचे मार्गदर्शन घेतले आणि कमी पाण्यावर डाळिंबाची शेती कशा पद्धतीने यशस्वी करता येईल याचे धडे दिले. साठे यांनी चार एकर क्षेत्रात भगवा जातीच्या रोपांची लागवड केली आणी पावसाळा वगळता आठ महिने टँकरने पाणी घालण्यास सुरूवात केली आणि डाळिंबाची बाग बहरली.
राजकिय वाटाघाटीत सन २००५ – २०१० या पंचवार्षिक मध्ये रूईखेलचा सरपंच झालो. गावात आमचे एकच घर पण गावाने खुप प्रेम दिले ज्या दिवशी सरपंच पद गेले त्याच दिवशी राजकारण सोडून दिले. आणि काळ्या आईची इमानदारीचे सेवा करण्याचा संकल्प केला. दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे खुप आडचणी येतात पण परमेश्वर मार्ग काढतो. शेतीतुन दर वर्षी १५ लाखाचा अपेक्षीत नफा ठेवून नियोजन केले जाते. एक कोटी लिटर चे एक शेततळे केले आहे. त्यामुळे पाण्याचा थोडा आधार आला आहे.
एक मुलगा एस.आर.पी.त भरती झाला. मोठा आनंद झाला पण शेती कोण करणार याचे मनात दुख होते ते दुख या क्षणी लपविले. दुसरा मुलगा बी.ए. झाला मी त्याला रमेश हिरवे यांच्याकडे वर्षभर कामाला ठेवले त्याला अनुभव आला याचा फायदा शेतीत होत आहे. याचे मनात समाधान आहे. आम्ही मोलमजुरी करणारी माणसं होतो पण रमेश हिरवे सारखा देव माणुस भेटला त्याने शब्दाचा आधार आणि वेळप्रसंगी मदतीचा हात दिला. आणि आमच्या जीवनाची भाग्यरेषा बदलून सध्या जीवनात संघर्ष आहे पण संघर्षातून समाधान मिळते. हा अनुभव आहे त्यामुळे अर्जुन शेतीत हिमतीने लढत आहे त्याला आमची फक्त साथ आहे.
संदेश
ध्येयाचा ध्यास हल्लीच्या मुलांची साहेब होणे हायफाय जीवन जगण्याची स्वप्न आहेत.श्रमाची लाज वाटते पण शेतीत करिअर घडविण्याचा ध्यास लागला कि श्रमाची लाज वाटत नाही. श्रमातून आणि सहकारी मित्रांच्या प्रेमातून आयुष्य फुलते मुलांनी शेतीत करिअर करावे जीवनात आनंद मिळेल. बाळासाहेब साठे, रुईखेल.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.
