शेतकरी/कामगार विरोधी कायदा, हाथरस अत्याचार घटना तसेच राहुल गांधीनां पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा व अटकेचा श्रीगोंदयात निषेध..

दिनांक २ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई नागवडे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी, कामगार विरोधी कायदा, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित मुलीवरील अत्याचार तसेच या पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला चाललेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा आणि अटकेचा निषेध करण्यासाठी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार चारुशीला पवार मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी (तालुका काँग्रेस अध्यक्ष) दीपक पाटील भोसले, मनोहर दादा पोटे, धनसिंग भोईटे, (महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे महासचिव)प्रशांत ओगले तसेच (युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष) गोरख बायकर, (शहराध्यक्ष) योगेश मेहेत्रे, (विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष) आदिल शेख (नगरसेवक) समीर बोरा, संदीप वागस्कर, प्रवीण ढगे , विकास काळे, निलेश उबाळे, शशिकांत जाधव, प्रशांत सिदनकर, स्मितलभैय्या वाबळे, आदेश शेंडगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(प्रशांत ओगले यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading