पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी: प्रा.सचिन जगदाळे

दिनांक २ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

नामांतर लढ्याचे सरसेनानी माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी स्थापन केलेल्या पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या अहमदनगर जिल्हा दक्षिण अध्यक्षपदी राष्ट्रकार्याध्यक्षा व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ. सूर्यकांता (ताई) गाडे यांनी प्रा.सचिन जगदाळे यांची निवड केली आहे.

यावेळी (प्रदेश युवा अध्यक्ष) डॉ. सिध्दांतदादा गाडे साहेब, नवनिर्वाचित (प्रदेश कार्याध्यक्ष) प्रा. निवृत्ती आरु (सर) व (प्रदेश सरचिटणीस) आकाशजी बिऱ्हाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

निवडी नंतर प्रा. जगदाळे म्हणाले आदरणीय गाडे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क अभियान राबवून गाव तेथे शाखा निर्माण करून, बहुजन समाजाचे प्रश्न मार्गी लावणार आहे. जगदाळे यांच्या निवडीबद्दल समाजातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

स्रोत:(सतीश ओहोळ सर यांनी दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading