मढेवडगांव वि.का.स.सोसायटीच्या वतीने म.गांधी व लालबहादुर शास्त्रीचीं जयंती साजरी..

दिनांक २ ऑक्टोबर(मढेवडगाव,श्रीगोंदा):

मढेवडगांव वि.का.सहकारी सोसायटीच्या वतीने कोरोनामुळे सोशियल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून, तोंडाला मास्क लावून, महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रथमता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांचे प्रतिमेच पुजन मढेवडगांव सोसायटीचे चेअरमन बबन(तात्या) उंडे यांनी केले. चेअरमन पंडितराव वाबळे यांनी प्रास्ताविकात सोसायटीच्या वतीने राबविन्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ग्रा.प.सदस्य राहुल साळवे यांनी लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्याची सखोल माहिती सांगितली. तसेच मढेवडगांव सोसायटीचे विद्यमान चेअरमन बापूराव वाबळे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.

मढेवडगांव वि.का.सहकारी सोसायटीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन बापूसाहेब वाबळे, ग्रा.प.सदस्य राहुल साळवे, व्हा.चेअरमन रावसाहेब जाधव, भिमराव फरकांडे, पंडितराव वाबळे, खंडेश्वर झिटे, बबन उंडे, गोरख मांडे, काकासाहेब मांडे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. राहुल साळवे यांनी सुत्रसंचलन केले व आभार बापूसाहेब वाबळे यांनी मानले.

स्रोत:(विजय मांडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading