“सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक युवा संघटने”चे संस्थापक आदेश शेंडगे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश निश्चित..

दिनांक २१ जुलै,श्रीगोंदा:

अहमदनगर जिल्ह्यात धनगर समाजाचा झंझावात निर्माण करणारे जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेते “सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक युवा संघटने“चे संस्थापक आदेश शेंडगे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे.

शेंडगे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की, धनगर समाजाचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेला सक्षम राजकीय पाठबळाची अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने सर्वानुमते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका लक्षात घेता. शेंडगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला राजकीय पर्याय मानून त्यात लवकरच प्रवेश करणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना समाज प्रवाहात आणण्यासाठी राजकीय किंवा शासकीय ताकत असणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असून सामान्यांच्या प्रश्नांसाठी ते पुढाकार घेत आहे. येणाऱ्या काळात सामाजाचा आरक्षणाचा प्रश्न व इतर महत्वाच्या सामाजिक भूमिकेसाठी आदेश शेंडगे पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

स्त्रोत:(आदेश शेंडगे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading