साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त १२ वी पास विद्यार्थ्यांचा सत्कार..

दिनांक २१ जुलै,पेडगाव/श्रीगोंदा:

येथील तथागत नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच १२ वी पास विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हातसें प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर अण्णा भाऊ साठे यांचे जीवन चरित्र व चळवळी साठी त्यांनी दिलेले योगदान यावर मान्यवरांनी आपले विचार मांडले. आयकॉन्स फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष नितीन घोडके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दिड दिवस शाळेत गेलेले आण्णा भाऊ यांचे लिखाण जगातील सत्तावीस भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे प्रचंड अभिमानस्पद असून, तेच खरे साहित्यरत्न आहेत. हजारोंच्या गर्दीसमोर एकट्याने उभे राहणे व अन्यायाचा प्रतिकार करणे म्हणजेच महापुरुषांचे खरे वारसदार होणे आहे.

शिक्षणासाठी पैसा,परिस्थिती अडसर नसून तुमचे इच्छाशक्ती अडसर आहे. ज्याची ज्वलंत इच्छाशक्ती आहे. त्याला शिक्षणापासून कोणीही अडवू शकत नाही. असे त्यांनी सांगितले.

दीपक म्हस्के यांनी जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भिम राव हे आण्णा भाऊंचे गीत सादर केले. अक्षय झगडे, प्रकाश घोडके, कोमल म्हस्के व तृप्ती म्हस्के यांनी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती यांची माहिती दिली.

याप्रसंगी ऋषिकेश अंबादास दिवटे, मोहिनी विकास घोडके, हृतिक हौसराव म्हस्के, रोहित संतोष साबळे, अनिकेत कैलास रणधीर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दीपक म्हस्के यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष दीपक दिवटे, ग्रा. सदस्य प्रकाश घोडके, उद्योजक राजेश दिवटे, वर्षा घोडके, राजू भोसले, अक्षय शिंदे, दयाराम शिंदे, अमोल घोडके, विनायक दिवटे, सुभाष दिवटे, महेंद्र दिवटे, मयूर दिवटे, अजय दिवटे, प्रशांत ननावरे, शरद शिंदे, अशोक करांडे, शामराव घोडके, किसन ओहळ, रवी कांबळे, बाळू साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत: (नितीन घोडके सर यांनी प्रसिध्दीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading