दिनांक ६ नोव्हेंबर,श्रीगोंदा:
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठतर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यांना सवलत मिळाल्याने त्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे.
अवकाळी पावसाने, आणि कोरोना मुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक स्थिती खालावलेली आहे.म्हणुन सद्याची परीस्थिती पाहाता.२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्र प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासाठी आँनलाईन प्रवेश घेतांना प्रवेश शुल्क दोन टप्यात भरण्याची सुविधा मंगळवार दि.३ नोव्हेंबर पासुन उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवेश आँनलाईन करीत असतांना संपूर्ण शुल्क भरण्याची गरज नाही.तर, शुल्काच्या पन्नास टक्के भरुन उर्वरित रक्कम दुसर्या टप्यात भरण्यात येईल. राज्यभरात अनेक ठिकाणी झालेले अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे हा निर्णय घेण्यात येऊन प्रवेशाच्या मुदतही वाढ करण्यात आल्याची माहिती कुलगुरु प्रा.ई.वायूनंदन यांनी दिली.

तरी राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुचना आहे. ज्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या अभ्यासक्रमसाठी प्रवेश घ्यायचा असेल. त्यांनी मुदतवाढ दि. ३ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत प्रवेश आँनलाईन करु शकतात. श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे सनराईज महाविद्यालया (मुक्त विद्यपीठाचे अधिकृत अभ्यास केंद्र) च्या प्राचार्या सौ.राजश्रीताई सतीश शिंदे यांनी ही माहीती दिली आहे.
स्रोत:(प्रा.गोरख उंडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
