दिनांक ६ नोव्हेंबर(कराड/मढेवडगाव,श्रीगोंदा):
अभिनव अटल, पणन, योजने अंतर्गत सहकारी संस्थांच्या कर्ज मागणी संदर्भात सत्यज्योत सहकारी संस्थेचे चेअरमन प्रा. योगेश मांडे व व्हाईस चेरमन या नात्याने राहुल साळवे व संस्थेचे सचिव प्रा. उगले अन आय. डी. बी. आय. बँकेचे अधिकारी श्री. दिपकजी ससाणे तसेच संपुर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून अनेकजण या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रसंग आला. त्यावेळी या सहकार क्षेत्रात आकाशा एवढी उंची लाभलेले, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची प्रितीसंगम, कोयना व कृष्णा नद्यांच्या संगमावर असलेल्या समाधीस्थळाला भेट देवुन, स्व.चव्हाण साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

संभाषण शैलीतील मनमिळाऊ, सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि प्राजंळ प्रचार ही मोठी शक्ती आहे, असे लक्षात आले; आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व सर्व कार्यकर्त्यां मित्रांच्या संघटित सहकार्याने आंदोलन अपराजित ठरले. कृष्णाकाठ या यशवंतरावांच्या आत्मचरित्रातल्या त्यांनी मनमोकळेपणाने सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या मोठेपणाची उंची दर्शवतात. कृष्णाकाठ तत्त्वांनी, कर्तव्यांनी भारलेला परीसर.. सहकारातील एका आंदोलनाच्या निमित्ताने या पावन परीसरात काल जाण्याचा योग आला.
:राहुल साळवे,मढेवडगाव,तालुका,श्रीगोंदा.
स्रोत:(राहुल साळवे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
