श्रीगोंदा… या दोघांनी पुण्यातील तरुणांना kidnapp केल्याने, हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल.. आरोपी अटक..

दिनांक ७ एप्रिल (श्रीगोंदा/हडपसर):

पैशाच्या व्यवहारापोटी वाद होऊन दोन तरुणांचे अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मारहाण करून त्यांना अ.नगर मध्ये सोडल्याचेही उघडकीस झाले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी श्रीगोंदयातील दोघांना अटक करत त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत लबडे (२६) व अनिकेत वाळके (२०) दोघेही रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ मार्च २०२१ रोजी दुपारी माळवाडी, हडपसर (पुणे) परिसरात झालेल्या पैशाच्या वादातून फिर्यादी व त्याच्या मित्राला आरोपींनी गाडीत बसवून अपहरण केले. ते त्यांना हडपसर येथील कॅनॉलजवळ घेऊन गेले. तेथे मारहाण करून पुन्हा गाडीतुन दोघांना आकुर्डीतील फ्लॅटवर घेऊन गेले. दिवसभर जबरदस्तीने डांबून ठेवत मारहाण केली. (After abducting two persons from Shrigonda and two from Pune, a case was registered with Hadapsar police .. Accused arrested ..)

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्यानंतर २७ मार्च २०२१ रोजी पुन्हा गाडीत बसवून हडपसर येथे फिर्यादीच्या मित्राला सोडुन दिले. परंतु, फिर्यादीला न सोडता ते त्याला गाडीतून अहमदनगरला घेऊन गेले. पुणे ते नगर प्रवासादरम्यान फिर्यादीच्या मोबाइलवरुन त्याच्या वडिलांना फोन केला. यानंतर पुण्यात फिर्यादीला सोडल्यावर त्याने हडपसर पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणात तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने यांच्या पथकाने दोघांना तालुक्यातील बेलवंडीतुन अटक केली आहे.

स्रोत:(ऑनलाईन न्यूज)

(प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading