दिनांक ७ एप्रिल, श्रीगोंदा
जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी व आठवड्याच्या शेवटी दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन अशा उपाययोजना लागू असतांना श्रीगोंदा शहरातील शनि चौक परिसरात काही शेतू चालक व खरेदीखत करणारे दुकानदार या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांना मूठमाती देत, श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या समोर बिनधास्तपणे शटर बंद करून खरेदीखताचे कामकाज करत आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोंदा येथे कामकाज चालू आहे. लोकं जमीन खरेदी करण्यासाठी दस्त बनवत आहेत. मात्र, हे खरेदी दस्त बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसत आहे. शनी चौक परिसरात हे लोक मोठ्या घोळक्यात जमून सदरील काम उरकत आहेत. असे दुकान चालू ठेऊन लॉकडाऊनच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे बोलले जात आहे. (Shrigonda… a basket of bananas to the collector’s order… a crowd of people in front of the police station to make a purchase fertilizer ignored by the administration…)
काल दिनांक ६ एप्रिल रोजी श्रीगोंदा शहरातील सर्व व्यापारी (छोटे-मोठे) राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दुकानं चालू ठेवण्यासंदर्भात श्रीगोंदा तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली. व्यापाऱ्यांनी केलेल्या मागण्यांच्या विनंतीला स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश दाखवत ते पाळण्याचे सुचित केलते.

मात्र, श्रीगोंदा तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनच्या दारातच चालू असलेले काही सेतू व खरेदीखत करणारे दुकानदार याठिकाणी चुकीच्या पद्धतीने “साथ प्रतिबंधक कायद्या“ला मूठमाती देत, स्वतःचे हित जपण्यात गर्क आहेत. त्यांना स्थानिक प्रशासनाची कोणतीही भीती अथवा दहशत राहिलेली नाही. याबाबत काही लोकांनी माध्यमांकडे तक्रारी केल्या असून, वस्तुस्थिती पाहिल्यानंतर या ठिकाणी अनेक लोकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नमूद खरेदीखत करणाऱ्या इसमास फोन करून माहिती विचारली तर, सेंटर बंद करून आम्ही खरेदी खत करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदरील दुकानांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामान्यांकडून होत आहे. प्रशासनाने एकीकडे काहींना सवलत तर, काहींना कायद्याची समरी वापरने ही पद्धत चुकीची असल्याचेही बोलले जात आहे.
स्त्रोत:(फोटो)
