दिनांक १७ नोव्हेंबर(शेडगाव,श्रीगोंदा):
शेडगाव ग्रामपंचायतीत सन २०१४ ते २०२० या कालावधीत झालेल्या कामाची चौकशी करून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी वामनभाऊ भदे (जिल्हा उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, अहमदनगर) यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १६ नोव्हेंबर रोजी “भव्य ढोल बजाव टाळे टोक” आदोलंन पंचायत समितीवर करनार होते. मात्र, याबाबत स्थानिक प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,शेडगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ठेकेदार व आधिकारी यांनी मिळुन सन २०१४ ते २०२० या कालावधीत लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप वामनभाऊ भदे यांनी केला आहे. शेडगाव ग्रामपंचायतला १४ व्या विक्त आयोगातील लाखो रूपयांचा निधी पाणीपुरवठा तसेच भूमिगत गटारीसाठी ९ लाख रूपयांच्या निधीतून निकृष्ट काम झाल्याचे भदे यांचे मत आहे.

८५ लाखांचा निधी हा १४ व्या विक्त आयोगा मधला खडीकरण व क्रोन्क्रीटी करण करण्यासाठी आला. मात्र, खुपच मोठा भ्रष्टाचार ठेकेदार, अधिकारी व पुढारी यांनी मिळुन केल्याचा आरोप भदेनीं केला आहे. गावातील ग्रामस्थांना या रस्त्यावर चालता येत नाही. पावसाळ्यात तर कोणीच या रस्त्याने प्रवास करू शकत नाही. शेरे वस्तीवरील काम अर्धवट तसेच आहे. मागासवर्गीय समाजातील लाईटचे काम लोकवस्ती सोडुन करण्यात आले आहे. तीच परिस्थिती गोदान नगर, रसाळ मळा, धेंडे वस्ती, रणसिंग वस्ती, भदे मळा, बोबडे वस्ती आशा कितीतरी ठिकाणच्या कामात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झालेला असुन, हा पैसा जनहिताचा असल्याने, ज्यांनी कोणी या सर्व कामात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे? त्या कामाची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत म्हणून, १६ नोव्हेंबर २० रोजी वामनभाऊ भदे (जिल्हा उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर) व कुष्णाभाऊ खामकर (अध्यक्ष प्रहार), माधवभाऊ बनसोडे (शहर अध्यक्ष), साहेबराव रासकर (जिल्हा संघटक), बाबासाहेब दरोडे पाटील (उपाध्यक्ष प्रहार) यांनी गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन, प्रशासक शेडगाव ग्रामपंचायत जगताप व ग्रामसेवक देवतरसे यांनी प्रथम चौकशी केली व आज दिनांक १७ नोव्हेंबर २० वार बुधवार या दिवशी गटविकास अधिकारी प्रशात काळे यांच्या आदेशाने चार आधिकारी यांची समिती स्थापन करून, गुण नियत्रण आधिकारी यांच्या मार्फत चौकशी करीत १० दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसे लेखी पत्र देण्यात आले. म्हणून, प्रहार जनशक्ती पक्षाचे आदोलंन सद्या स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी शेडगाव ग्रामपंचायतचे सदस्य झुबरराव जांभळे (सदस्य), महेंद्रभाऊ रणसिंग (ग्रामपंचायत सदस्य), भाऊसाहेब गवळी (मा. ग्रामपंचायत सदस्य) संजयभाऊ भुजबळ, आमोलभाऊ धेंडे, राजुभाऊ कोथींबीरे, तुकाराम भोपळे, सुरेशभाऊ कोकरे, भागवत व्यवाहारे व शेडगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
स्रोत:(वामन भदे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
