मृत्युशी झुंज देणाऱ्या १५ वर्षाच्या वडाच्या झाडाचे पुन्हा रोपण.. श्रीगोंद्यातील वृक्षप्रेमींचा उपक्रम..

दिनांक १२ जून २०२६ श्रीगोंदा:

विज वितरणाला अडथळा ठरणाऱ्या श्रीगोंदा शहरातील स्टेशन रोडवरील एक वड काढला हा वड रस्त्याच्या बाजुला मृत्युशी झुंज देत होता जगतगुरु संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा शहरातील वृक्षप्रेमींनी क्रेनच्या साह्याने वन विभागाच्या जागेत गुरुवारी या झाडाचे रोपन केले.

जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदण्यासाठी धनराज कोंथबीरे व जमीर जकाते यांनी मदत केली. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी पाच हजार लिटरचा टॅक्कर पाठविला. तीन फुट व्यास आणि दहा फुट उंच असलेला वडाच्या झाडांचे रोपन करण्याचा वृक्षप्रेमींनी आनंद लुटला.

जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती उमेश परहर म्हणाले, श्रीगोंदा येथील जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समितीने झाडे लावण्यासाठी चांगली चळवळ हाती घेतली आहे. ही काळाची गरज ओळखून सर्व नागरिकांनी या चळवळीत योगदान देण्याची गरज आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, धनराज कोंथबीरे, नवनाथ दरेकर, नानासाहेब कोंथबीरे, ऋतीक शिंदे, उमेश प्रहार, संजय पटवा, प्रा बापू देवकर, adv. सुनील दरेकर, गौरव मेहेत्रे, जमीर जकाते, झहीर जकाते यांनी रोपन करण्यासाठी श्रमदान केले.

स्रोत :(प्रसिद्धी पत्र )

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading