दिनांक ६ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंगळवारी पंचायत समिती श्रीगोंदा येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. येथील ७२ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. सुदैवाने या चाचणीत सर्व कर्मचारी निगेटिव आले आहेत.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने, पंचायत समिती श्रीगोंदा येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. प्रशांत काळे (गट विकास अधिकारी), डॉक्टर नितीन खामकर (तालुका आरोग्य अधिकारी), अमोल गोसावी, श्रीकांत दातीर (कार्यालयीन अधिक्षक) व कर्मचारी युनियनचे (तालुकाध्यक्ष) नागेश लोखंडे यांनी यासाठी सहकार्य केले.
यावेळी प्रशांत काळे म्हणाले की, पंचायत समिती मध्ये कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या संशयामुळे प्रत्येक जण दबावाखाली कामावर येत होता. आता चाचणीमुळे दबाव कमी होईल असे सांगितले. यावेळी सर्वांनी डॉक्टर खामकर व त्यांचे आरोग्य युनिटचे आभार मानले.
स्रोत:(नागेश लोखंडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
