कारगिल युद्धात डोळा गमावलेल्या जवानाने जिंकली शेतीतील लढाई..

कारगिल युद्धात शत्रूशी लढताना एक डोळा निकामी झाला अशा परिस्थितीत हिम्मत न हारता पारगाव सुद्रिक येथील जवान विश्वनाथ लक्ष्मण ननवरे यांनी सेवा निवृत्तीनंतर शेतीत दुसरी लढाई सुरू केली. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंब, द्राक्ष, वांगी, कलिंगड, टरबूज लागवड केली आणि सहा एकर शेती जमीन खरेदी केली जवावाने शेतीतील लढाई जिंकली आहे.

विश्वनाथ लक्ष्मण ननवरे हे वडार समाजातील व घरची आठरा विश्व दारिद्री परिस्थिती मुळे सैन्य दलात भरती झाले. वडिलोपार्जित एक एकर शेती वाट्याला आली. पत्नी सुनिता बाईनी शेतीत काम करून श्रीराम व श्रीमान या दोन मुलांचा शिक्षणाचा गणेशा सुरू केला श्रीरामने इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली केली श्रीमान याने शाळा सोडून शेतीत काम सुरू केले. विश्वनाथ ननवरे यांनी भारतीय सैन्य दलात काम करत असताना श्रीलंकेतील शांतता मोहिमेत भाग घेतला त्यानंतर कारगिल युद्धात शत्रूशी लढताना एक डोळा निकामी झाला आणि सेवानिवृत्ती घेतली गावी परतल्यानंतर मित्रांच्या मदतीने शेतीत लढाई सुरू केली नाना मडके, नितीन एरंडे, जब्बार इनामदार यांचे मार्गदर्शन घेतले टरबूज, कलिंगड सारखी कमी कालावधीची पिके घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर तीन एकर क्षेत्रावर डाळिंब, एक एकर क्षेत्रात लिंबोणी आणि एक एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड केली आहे. आणि बोरटोक या सुधारित जातीचे वांगी लागवड श्रीगोंदा तालुक्यात प्रथमच केली गेल्या वर्षी एक क्षेत्रात वांग्याचे १० मे.टन उत्पन्न काढले . सुमारे अडीच लाखाचा नफा मिळविला यंदा बोरटोक या वाणाची लागवड पून्हा केली आहे. यामधून उत्पादन खर्च वजा जाता दोन लाखाची कमाई होण्याचे गणित केले आहे. तोट्यात असलेली शेती या जवावाने नफ्यात आणली सहा एकर नवीन शेती खरेदी केली आणि माळरानावर नंदनवन उभे केले आहे. मैत्रीच्या संगतीमुळे रंगत आली.

पारगाव सुद्रिक शेतीसाठी अग्रेसर होते पण आपणांस शेती जमेल की नाही अशी भिती होती, पण नाना मडके, नितीन एरंडे, जब्बार इनामदार यांची सुसंगत लाभली आणि शेती फुलली शेतीतून पैशाबरोबर आनंद मिळाला. पारगाव मध्ये संपर्क वाढला आणि जीवनात नवी रंगत निर्माण झाली आहे. –विश्वनाथ ननवरे पारगाव सुद्रिक

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading