कोरोनामुळे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यक्रम रद्द : यु.जी. बोराडे.

दिनांक १४ मार्च,मुंबई :

कोरोना या साथीच्या पार्श्वभूमी वर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केलेले असुन, कोल्हापुर जिल्ह्यातील माणगाव येथील दि.२१ व २२ मार्च २०२० रोजी आयोजीत केलेली परिषद पुढे ढकललेली आहे.

त्याच बरोबर भारतीय बौद्ध महासभेने दि २० मार्च २०२० रोजी महाड येथील चवदार तळयाचा वर्धापन दिनाचा जाहीर कार्यक्रम प्रशासनाने पुढे ढकलण्याबाबत सुचना केल्यानुसार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या केंद्रीय बैठकी मध्ये महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या अवाहानानुसार राज्यात निर्माण झालेल्या कोरोना साथीमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यु.जी.बोराडे यांनी सांगितले आहे.

या बैठकीस आद.एस.के.भंडारे (राष्ट्रीय सचिव व स्टाफ ऑफिसर,समता सैनिक दल ) आद.अरूणजी साळवे (राष्ट्रीय कोषाध्यक्ष) आद.भिकाजी कांबळे ( राष्ट्रीय सचिव व पालकमंत्री महाराष्ट्र राज्य ) आद . बी .एम. कांबळे ( अध्यक्ष मुंबई प्रदेश ) इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

सतिश ओहोळ ( सर ) सचिव भारतीय बौद्ध महासभा (अहमदनगर जिल्हा दक्षिण )..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading