महिलेच्या पोटात असह्य वेदना होत असतानाही, डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास दिला नकार.. पीडितांनी केली कारवाईची मागणी..

दिनांक २९ एप्रिल,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील एकमेव अधिकृत सोनोग्राफी सेंटर म्हणून विख्यात असलेले,डॉक्टर उत्तम वडवकर यांचे सोनोग्राफी सेंटरमध्ये संबंध तालुक्यातून सोनोग्राफीसाठी लोक येत असतात. श्रीगोंदा शहरासह तालुक्‍यातील विविध भागातून पीडित रुग्ण या ठिकाणी तपासणीसाठी येतात.

अशा प्रकारे कोरोनाच्या आपत्तीमध्ये श्रीगोंदा शहरालगत असलेल्या औटीवाडी येथील चंद्रकांत औटी यांच्या पत्नीला पोटामध्ये असह्य वेदना होत असल्याकारणाने, त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते सोनोग्राफीसाठी दिनांक २८ एप्रिल रोजी डॉक्टर उत्तम वडवकर यांच्या सोनोग्राफी केंद्रात गेल्या होत्या. त्या ठिकाणी बराच वेळ रांगेत बसून अनुक्रमे तपासणी करण्यासाठी थांबल्या.मात्र,डॉक्टर वडवकर यांनी नमूद महिलेला सोनोग्राफी करता येणार नसल्याचे सांगितले.पीडितेला असह्य वेदना होत असतानाही, डॉक्टरांनी त्या महिलेचे काहीही ऐकून न घेता तिला घरी पाठवून दिले. पर्यायी व्यवस्था नसल्याने पूर्ण रात्रभर वेदना सहन करत त्या नमूद महिलेला घरी रहावे लागले.

वाहन बंद तसेच लागलीच नगर किंवा पुण्याला दवाखान्यात जाण्यासाठी सुविधा उपलब्ध न झाल्याने,दुसऱ्या दिवशी महिलेच्या संबंधितांनी डॉक्टर वडवकर यांना फोन करून वारंवार सोनोग्राफी करण्यासंदर्भात विनंती केली.मात्र, सोनोग्राफी करण्याऐवजी फोनवरच डॉक्टर व त्यांच्या पत्नीने अरेरावीची भाषा वापरत पीडित महिलेच्या घरच्यांना सोनोग्राफी करता येणार नाही असे सांगितले. आम्ही फक्त प्रेग्नेंट (गरोदर) महिलांना तपासत आहोत.तुमच्या पेशंटची तपासणी करु शकत नाही.कितीही अडचण असली तरी,आम्ही तपासणार नाही.भले दवाखाना बंद करण्याची वेळ जरी आली.तरी, बंद करीन,पण तुमचे पेशंट तपासणार नाही,अशी भाषा वापरत पेशंटचे संबंधित अनिल वसंत औटी यांना फोनवर दरडावले, अनिल औटी यांनी कृपा करून सोनोग्राफी करा,तुम्हाला शासनाची मान्यता असून, या कोरोना आपत्तीमध्ये सर्व रुग्णालयांना गंभीर स्थितीतील रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याच्या शासकीय सूचना असतांना,तुम्ही पेशंट तपासणीसाठी टाळाटाळ करू नका असे सांगितले.यावर डॉक्टर उत्तम वडवकर यांना राग अनावर होऊन,त्यांनी अनिल औटी यांना दरडावून पेशंटला तपासण्यासाठी नकार दिला.

महिलेस गंभीर वेदना होत असतानाही तपासण्यास टाळाटाळ केल्याने,अर्वाच्च भाषा वापरल्याने तसेच शासकीय व प्रशासकीय प्रक्रियेला गैर शब्द वापरल्याने,डॉक्टर वडवकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अनिल औटी यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच तक्रारीच्या प्रति जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा,तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीगोंदा तसेच जिल्हा श्यल्य चिकित्सक, अहमदनगर यांनाही देण्यात आल्या आहेत.

या संदर्भात पत्रकारांनी डॉक्टर वडवकर यांना माहितीसाठी विचारणा केली असता, पत्रकारांना ही उडवाउडवीचे उत्तर देत आपल्या जबाबदारीतून डॉ. वडवकर यांनी पळ काढला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading