भुकेलेल्यांचा आधार सांगतात ‘जपावे आपणाशी आपण’

दिनांक २९ एप्रिल(लिंपणगाव,श्रीगोंदा):

ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे प्रमुख तथा भटके-विमुक्त समाजाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व निवारा बालगृहचे संस्थापक अध्यक्ष यांना लोणी व्यंकनाथ आणि ढोकराई कारखाना या आदिवासी ,भटके विमुक्त समाजातील बत्तीस कुटुंबाचे हातावर पोट असणारे पारधी ,रामोशी, चर्मकार, डवरी गोसावी, वडारी, जोशी, नंदीवाले ,मातंग ,बौद्ध समाजातील काही कुटुंबांना बऱ्याच दिवसांपासून अन्नधान्य नसून त्यांची उपासमार चालू आहे.अशी माहिती मिळाल्यावर लता सावंत व मनीषा काळे,संतोष भोसले, छाया भोसले, ज्योती भोसले ,आसाराम काळे, शरद काळे ,विलास काळे, कोळपे अण्णा, मनीषा काळे ,सुनिता बनकर, शिंदे जालिंदर, पुष्पा कुसळकर, रोहिणी राऊत ,उज्वला मदने या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सदरील माहिती फोन द्वारे अॅड. अरुण जाधव यांना सांगितली.

यानंतर अरुण जाधव यांनी पुणे येथील इकोनेट नावाच्या सामाजिक संस्थेकडे विनंती करून गौरीताई भोपटकर यांच्याशी संवाद साधून,ही माहिती सांगितली.त्यांनी तातडीने या कुटुंबाला आपण १५ दिवस पुरेल एवढा किराणा देवू व त्यांची उपासमार थांबवण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करू असे सांगितले. आज त्यांनी दिलेल्या मदतीमुळे ३२ कुटुंब व या ३२ कुटुंबातील जवळजवळ १६९ लोकांची उपासमार थांबली आहे.

इकोनेट व ग्रामीण विकास केंद्र जामखेड या दोन्ही संस्थांच्या वतीने वरील भटके-विमुक्त, आदिवासी, एकल महिला यांना मदत करण्यात आली या वेळी अॅड. अरूण जाधव बोलतांना म्हणाले की,आपण सर्व सोबत आहोत त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.या कोरो‌ना महामरीमुळे शासनाणे ज्या अटी व नियम दिलेले आहेत ते जपून आपण सर्वांनी “जपावे आपणाशी आपण ” मदतीसाठी सहकार्य करण्याचे काम संस्थेचे संचालक बापू ओहोळ(सर),समन्वयक सचिन भिंगारदिवे ,केसकर सर ,राकेश साळवे, संतोष चव्हाण व सर्व कार्यकर्ते लोणी व्यंकनाथ आणि ढोकराई कारखाना अशी माहिती लोकअधिकार आंदोलन या संघटनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक संतोष भोसले यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading