दिनांक २९ एप्रिल(मढेवडगांव,श्रीगोंदा):
१९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरिगेशन कॉलनी मढेवडगांव ता.श्रीगोंदा येथील इयत्ता ३ री तील स्वरा भास्कर दिघे ही २७४ गुण मिळवून केंद्रात पहिली तर जिल्ह्यात १२ वी आली आहे.
सार्थक भाऊसाहेब मांडे हा १२४ गुणांसह केंद्रात पाचवा तर,जिल्ह्यात १४ वा आला आहे.अमृता उत्तम धावडे ही केंद्रात ३ री तर,जिल्ह्यात १५ वी आली आहे.प्रिया दिपक कटारे ही २५८ गुणांसह केंद्रात ४ थी तर जिल्ह्यात २० वी आली आहे. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दरेकर, वर्गशिक्षिका मोहिते, केंद्रप्रमुख झावरे यांचे मार्गदर्शन लाभले. तर विद्यार्थ्यांचे अभिनंदन सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच कल्याणी गाढवे, भाऊसाहेब मांडे, संतोष मांडे यांनी केले.
