विवाहितेवर अत्याचार करणारा आरोपी अमोल धर्माधिकारी अजूनही मोकाट; समाजातून संतापाची लाट, आंदोलनाची तयारी..

श्रीगोंदा, दि. २१ सप्टेंबर २०२५:

श्रीगोंदा शहरातील नामांकित सुवर्णकार व्यापारी धर्माधिकारी यांचा मुलगा अमोल धर्माधिकारी याच्यावर बलात्कारासह गंभीर गुन्हे दाखल झाले असूनही, आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे समाजात तीव्र संताप उसळला असून भटके विमुक्त समाजाने आंदोलनाची हाक देण्याचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत आरोपी अमोल धर्माधिकारी याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या गंभीर गुन्ह्याची नोंद पोलिसांत झाली असूनही आरोपी अजूनही अटकेच्या बाहेर आहे..

या पार्श्वभूमीवर भालचंद्र सावंत (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र निर्माण दल व भटके विमुक्त समाजाचे राज्य कार्यकर्ते) यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. “इतक्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरतो आहे, हे समाजाला मान्य नाही. आरोपी अटकेसाठी लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

या प्रकरणाचे तपासी अधिकारी पी.एस.आय. संजय वाघमारे यांनी सांगितले की, “आरोपी अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच तो कायद्याच्या तावडीत येईल.” मात्र, आरोपीला अद्याप अटक न झाल्याने पीडित कुटुंब आणि समाजातून संताप व्यक्त होत आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading