दिनांक २० सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:
#Rape,#crime news,#Viral link, #shrigonda
श्रीगोंदा शहरातील नामांकित धर्माधिकारी सुवर्णकार व्यापारी यांचा मुलगा अमोल कमलाकर धर्माधिकारी (रा. रविवार पेठ, श्रीगोंदा) याने लग्नाचे आमिष व मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत एका भटके विमुक्त समाजाच्या विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता आनंदकरमळा येथील आरोपीच्या शेतात घडली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(m), ६४(१) आणि ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघमारे करीत आहेत.

🔹 विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांत श्रीगोंदा शहर व परिसरात लग्नाचे आमिष दाखवत महिला, मुली व अल्पवयीन मुलींचे शोषण झाल्याच्या अनेक घटना प्रकाशात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा नागरिकांत अस्वस्थता निर्माण केली आहे.

🔹 धर्माधिकारी सुवर्णकार व्यापारी हे शहरातील प्रस्थापित नाव असून, त्यांचा हा मुलगा शेती पाहत असतो.. त्याच्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण व्यापारी समाजासह शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise..
