दिनांक २० सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा/ग्वाल्हेर:
ग्वाल्हेर खंडपीठाच्या हायकोर्टानं शुक्रवारी दिलेल्या महत्वाच्या आदेशानुसार सिंधिया घराण्याच्या सर्व सदस्यांनी ९० दिवसांच्या आत परस्पर सहमतीनं दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संपत्ती वादावर तोडगा काढावा. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ न्यायालयात प्रलंबित असलेल्या या खटल्यामुळे आता समाधानाची चिन्हं निर्माण झाली आहेत.

सुरुवातीला या खटल्यात माधवराव सिंधिया हे पक्षकार होते. त्यांच्या निधनानंतर पुत्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बाजू मांडली. आता कोर्टाने ज्योतिरादित्य सिंधिया, वसुंधराराजे, यशोधराराजे आणि उषाराजे या सर्व वारसदारांना मिळून संपत्तीचे विभाजन करण्याचे आदेश दिले आहेत.

या वादात ग्वाल्हेरमधील ऐतिहासिक जयविलास पॅलेस, राणी महल, विजयभवन, हिरणवन कोठी, शांतीनिकेतन यांसह महाराष्ट्रातील श्रीगोंदा आणि लिंपनगावातील जमिनी, तसेच मुंबईतील समुद्र महल या बहुमूल्य मालमत्तांचा समावेश आहे. या संपत्तीची एकूण किंमत हजारो कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज आहे.

हायकोर्टाच्या या निर्णयानंतर सिंधिया कुटुंबातील पिढ्यानपिढ्यांचा मालमत्ता वाद अखेर मिटण्याची शक्यता असून, श्रीगोंदा व लिंपनगाव परिसरात याकडे विशेष लक्ष लागले आहे.
स्रोत:(ऑनलाईन माहिती)

Advertise..
