श्रीगोंदा शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाईचे संकेत..? त्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यावर कारवाईची शक्यता…!

दिनांक ६ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:

तालुक्यातील संघटित गुन्हेगारी नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. यामध्ये, श्रीगोंदा शहरातील काही व्यक्तींवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार असल्याची संकेत देण्यात आलेले आहेत. विशेषतः, श्रीगोंदा शहरातील एक मोठे आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार असल्याचे समजते आहे.

श्रीगोंद्यातील या व्यक्तीने अनेक सामाजिक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला असून, समाजातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यामुळे तो एक प्रमुख सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता असताना, या बाबतीत पोलीस यंत्रणेकडून मोक्का अंतर्गत कारवाई होण्याचे चिन्हं दिसत आहेत.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध आहे. श्रीगोंदा शहरात या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

स्रोत:(अधीकृत माहितीनूसार)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading