श्रीगोंद्यात राहुल सोलापूरकर यांचा निषेध; छत्रपती शिवरायांबाबतच्या वक्तव्याचा जाहीर निषेध..

दिनांक ७ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोधपूर मारुती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेचे दहन करून संतप्त शिवप्रेमींनी आपला तीव्र रोष व्यक्त केला.

राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवराय आग्र्याहून सुटताना लाच देऊन सुटल्याचे घाणेरडे विधान केले होते. या वक्तव्यामुळे शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी आंदोलनाच्या वेळी आपल्या भाषणात, “छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी,” अशी मागणी केली.

यावेळी शिवजयंती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बालू दादा मखरे, दीपक मखरे, तालुका अध्यक्ष राजकीय श्याम जारे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे, अजित भाई शेख, चिनू भाई शेख, किशोर भुते यांसह असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading