श्रीगोंदा, दि. १८ फेब्रुवारी २०२६:
तालुक्याचे युवा नेते तथा परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सीईओ प्रताप सिंह बबनदादा पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एकच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
या निमित्ताने प्रभागातील लोखंडेवाडी प्राथमिक शाळा, दत्तवाडी प्राथमिक शाळा, रजिस्टर मळा प्राथमिक शाळा आणि श्रीराम नगर प्राथमिक शाळा या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या मनोबल वृद्धीसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक एक मधील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आदित्य लोखंडे यांनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे नेतृत्व केले. त्यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या आदित्य लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या नेतृत्वामुळे प्रभाग क्रमांक एकमध्ये सामाजिक कार्याची नवी दिशा मिळत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
कार्यक्रमास उद्योजक दीपक शिंदे, डॉ. भांडवलकर, पैलवान नंदू रेपाळे, उद्योजक रवी दादा पोटे, उद्योजक तुषार पोटे, तसेच अविनाश टकले यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अशा उपक्रमांचे कौतुक केले.
प्रताप भैय्या पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग एकच्या वतीने आणि श्रीगोंदा शहराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. समाजहित जपणाऱ्या अशा उपक्रमांमुळे वाढदिवस साजरा करण्याची सकारात्मक परंपरा अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

