दिनांक ७ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
आज, गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीगोंदा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष/लोकनेते मनोहर दादा पोटे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार व मा.आमदार श्री राहुल कुंडलिकराव जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात संत श्रेष्ठ शेख महंमद महाराज मंदिराचा परिसर घोषणांच्या आतषबाजीत दणाणून गेला.
यावेळी राहुल दादा जगताप यांच्या सोबत श्रीगोंदा शहरातील अनेक नामवंत नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
केशव भाऊ मगर, उत्तमराव डाके, माणिक आप्पा पाचपुते, विलास काका वाबळे, संजय आबा जामदार, दीपक पाटील भोसले, हरिदास आबा शिर्के, अतुल दादा लोखंडे, सुभाषराव काळाने, राजकुमार पाटील, अत्तर भाई शेख, अजित काका जामदार, अशोकराव वाखारे, राजाभाऊ लोखंडे, श्री खेडकर, रफिक भाई पठाण यांसह शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर बोलताना मनोहर दादा पोटे यांनी सांगितले की, “राहुल दादा जगताप यांच्याशी आपला असलेला आत्मीयतेचा संबंध आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान लक्षात घेता, आम्ही त्यांना निवडणुकीत भरभरून समर्थन देत आहोत.” पोटे यांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे राहुल दादा जगताप यांच्या विजयामध्ये विक्रमी वाढ होईल, अशी भावना शहरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
संपूर्ण शहरात या निर्णयामुळे नवीन उमेदवारांसाठी आव्हान वाढले असून, निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह आणि विजयाचा विश्वास निर्माण झाला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




