दिनांक २३ सप्टेंबर,श्रीगोंदा:
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष अ. गफ्फार शेख यांनी अख्तर शेख यांना दिले आहे.
अख्तर शेख हे राष्ट्रवादीचा मुस्लिम (अल्पसंख्याक) चेहरा म्हणून, ओळखले जातात. सलग १५ वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून, तसेच ५ वर्षे उपनगराध्यक्ष म्हणून श्रीगोंदा नगरपालिकेत काम पाहिले आहे. ते पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीतच आहेत.
२०१५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी पक्ष सोडून गट स्थापन केला. परंतु, अख्तर शेख राष्ट्रवादीत राहिले, पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी दिली असल्याचे स्पष्ट होत आहे.
नूतन प्रदेश सचिव अख्तर शेख यांचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, ना. नबाब मलिक, आ. अरुणकाका जगताप, मा.आ. राहुल जगताप, घनश्याम शेलार, राजेंद्र फाळके, आ. रोहित पवार, आ. निलेश लंके, आ. संग्राम जगताप, हरिदास (आबा) शिर्के सह सहकारी मित्रांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
स्रोत:(शेख यांना देण्यात आलेले नियुक्ती पत्र)
