अहमदनगरचे नवीन SP म्हणून मनोज पाटील यांची नियुक्ती.

दिनांक १८ सप्टेंबर,अहमदनगर:

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची अगदी पाच महिन्यांतच बदली झाली असून, अहमदनगरचे नवे SP म्हणून सोलापूर येथील मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

गुरुवारी पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीतील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे शासनाने आदेश काढले आहेत. अखिलेश कुमार सिंह यांना अद्यापपर्यंत बदलीचे ठिकाण मिळालेले नसून, त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले असल्याचे समजते आहे.

नवीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे लवकरच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. आधीचे SP अखिलेश कुमार सिंह यांनी एप्रिल महिन्यात अहमदनगरचा पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच सप्टेंबरमध्ये बदली झाल्याने, जिल्ह्यात कमी कालखंडात बदली होणाऱ्या यादीत सिंह यांची गणना होत आहे.

स्रोत:(अधिकृत मिळालेली माहिती)

Leave a Reply