विशाल घोडके यांची RPI (A) च्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष (प्रभारी) पदी नियुक्ती होणार का..?  नगर येथील राज्य आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करित.. विविध निवडींबाबत औपचारिक चर्चा..!

दिनांक २४ एप्रिल २०२४, अहमदनगर:

श्रीगोंदा तालुक्यातील झुंजार नेतृत्व आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागी होणारे फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विशाल गौतम घोडके यांची लवकरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष (प्रभारी पदी) नियुक्ती होणारं असल्याची चर्चा.. आज अहमदनगर येथील आयोजित कार्यकर्ता बैठकीत करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. यावेळी राज्य, जिल्हा आणि जिल्ह्यातील तालुका कार्यक्षेत्रातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अग्रणी असणारे, तसेच नुकत्याच झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन, समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत मोलाचा वाटा उचलत जयंती कार्यक्रम मोठया आनंदाने साजरा करण्यात विशाल घोडके यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच, कार्यक्षेत्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक प्रकरणांत ते सामाजिक भान जागृत ठेवून सक्रिय राहीले आहेत. याचबरोबर घोडके कुटुंब श्रीगोंदा शहरासह तालुक्यात मोठया संख्येने वास्तव्यास असल्याने विशाल घोडके यांच्या नावाला अनेकांकडून दुजारा देण्यात आल्याचे समजते आहे.

त्यांच्या सामाजिक कामांची दखल घेऊन, आज दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठकीत विशाल घोडके यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष (प्रभारी) पदाची जबाबदारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. यावेळी विशाल घोडके यांनी संघटनेने दिलेली जिम्मेदारी यथोचित पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणारं असल्याची ग्वाही याठिकाणी उपस्थित पदाधिकारी, सहकारी आणि संघटनेच्या जबाबदार कार्यकर्त्यांसमोरं बोलतांना व्यक्त केली आहे. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाल्याने श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी विशाल घोडके यांची वर्णी लागणार का..?.. हे लवकरच स्पष्ट होईल.. असेही काही जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून मत व्यक्त करण्यात येत आहे.

या बैठकीत विजय वाघचौरे (RPI, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष), अंकुश भैलुमे (RPI, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष), राजाभाऊ कापसे (RPI, महाराष्ट्र, सचिव), सुनिल साळवे (RPI, जिल्हाध्यक्ष, दक्षिण अ.नगर), गौतम काशिनाथ घोडके (RPI, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, निरीक्षक), गौरव घोडके (जिल्हा उपाध्यक्ष, अ.नगर), किरण दाभाडे (RPI, शहर जिल्हाध्यक्ष, अ.नगर), विजय भांबळ (RPI, सरचिटणीस, अ.नगर), पप्पु घोडके (RPI, श्रीगोंदा, तालुका उपाध्यक्ष), समवेत विशाल गौतम घोडके यांच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष प्रभारी पदी नियुक्तीचे अधिकृत पत्र लवकरच सर्वांसमोर येईल असे आश्वासन घोडके यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading