लक्ष्मीबाई कलगुंडे यांचे वृद्धपकाळाने निधन..

दिनांक २५ एप्रिल २०२४,कोळगाव:

तालुक्यातील कोळगाव येथील रहिवाशी आदर्श माता, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व लक्ष्मीबाई धोंडीबा कलगुंडे (वय -८८ वर्षे) यांचे वृद्धपकाळाने मंगळवार दिनांक २३/०४/२०२४ रोजी संध्याकाळी ४:१५ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे तीन मुले, तीन मुली, चार सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अतिशय कष्टातून या मातेने शून्यातून प्रपंच उभा करून, समाजात एक आदर्श निर्माण केला. त्या शिक्षक बँकेचे माजी चेअरमन कै.धोंडीबा कलगुंडे यांच्या पत्नी तसेच, शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे, सुरेश कलगुंडे, इंजि.अशोक कलगुंडे, सेवानिवृत्त आदर्श प्राध्यापिका सुशिला पंढरीनाथ हिरगळ, मुख्याध्यापिका मंगला पांडुरंग हिरगळ, मंदा पाटीलबा थोरात यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या निधनामुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा दशक्रियाविधी गुरुवार दिनांक २/०५/२०२४ रोजी कोळगाव येथे होणारं आहे.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading