कोकणगाव हत्याकांडातील आरोपींना अभय.? आंबेडकरी चळवळ आक्रमक, पोलीस अधिकाऱ्यावर ‘कलम ४’ नुसार कारवाईची मागणी..!

दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:

तालुक्यातील कोकणगाव येथे महिनाभरापूर्वी झालेल्या भीषण हल्ल्यात भाऊसाहेब रजपूत या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, या घटनेला एक महिना उलटूनही पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणेच्या संथ कारभारामुळे पीडित कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नाही.

प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी श्रीगोंद्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

१६ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेनंतर पीडित कुटुंबाला संरक्षण देण्यात आलेले नाही, तसेच समाज कल्याण कार्यालयाकडून मिळणारी आर्थिक मदतही अद्याप पोहोचलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आणि काही संशयित आरोपींची सुटका करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या ‘अर्थपूर्ण’ भूमिकेमुळे जनसामान्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन श्रीगोंदा येथे आयोजित आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले.

कर्तव्यपालनात कसूर केल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलीस अधिकारी शिंदे यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील (Atrocity Act) Section 4 नुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहे Section 4?
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याचे Section 4 (कलम ४) हे लोकसेवकाने (Public Servant) आपल्या कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याबद्दल शिक्षेची तरतूद करते. जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने या कायद्यांतर्गत पीडिताला मदत करण्यास किंवा तपास करण्यास टाळाटाळ केली, तर त्यांच्यावर या कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.

स्थानिक पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महिला व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात येईल. या रॅलीद्वारे तहसीलदार श्रीगोंदा यांना मागण्यांचे निवेदन दिले जाईल.

https://amzn.to/4kHzVDS

सोमवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व्यापक ‘जनांदोलन’ छेडले जाणार आहे.

आज आयोजित बैठकीला श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांतील जबाबदार पदाधिकारी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“जोपर्यंत मुख्य आरोपींना अटक होत नाही आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील,” असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

स्रोत:(आयोजित बैठक)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading