दिनांक १७ फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा:
नगर-दौंड महामार्गावर काष्टी येथील वाघजाई चौकात आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात काष्टी येथील प्रसिद्ध लोकसेवा हॉटेलचे मालक बाळासाहेब माने यांचे चुलत भाऊ संतोष शिवाजी माने व सचिन शिवाजी माने या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आणि सचिन हे दोघे मंगळवारी (दि. १७) पहाटे ४ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून जात असताना वाघजाई चौकात त्यांची आणि पिकअपची जोराची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन्ही भावांचे जागीच निधन झाले.
मयत संतोष व सचिन हे काष्टी येथील जुन्या पिढीतील सायकल दुकानदार शिवाजी माने यांची मुले होत. एकाच वेळी दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने माने कुटुंबावर आभाळ कोसळले असून संपूर्ण काष्टी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

