गणेश भोसने केलेले बेकायदेशीर अतिक्रमन व दिलेल्या धमकीबाबत पोलीस व नपा प्रशासन उदासीन असल्याने कारवाईसाठी २८ डिसेंबर रोजी मेथा व मेहता यांचे अमरण उपोषण.

दिनांक १९ डिसेंबर श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील बालाजी मंगल कार्यालय व आसपास असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये मेथा व मेहता यांचे खाजगी क्षेत्र आहे. याठिकाणी असलेल्या रिलायन्स मोबाईल टॉवरच्या समोर मेहता यांच्या जागेमध्ये तसेच सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करून गणेश बाबासाहेब भोस व त्याच्या सहकाऱ्यांनी अनधिकृत पत्र्याचे शेड बांधले आहे. मेथा यांनी विचारणा केली असता, भोस यांनी अश्लील भाषा वापरीत मारहाण करील व बुलडोझर लावून सर्व बांधकाम पाडण्याची धमकी दिली आहे. याविषयी स्थानिक प्रशासनाचे पोलीस निरीक्षक व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तक्रार अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने, दिनांक २८ डिसेंबर २०२० रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर मेहता व मेथा हे कारवाईसाठी आमरण उपोषण सुरू करणार आहेत. पीडितांनी अधिकृत प्रसिद्धी पत्र माध्यमांना दिले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सविस्तर वृत्त असे की, मेथा व मेहता यांचे श्रीगोंदा बाजारतळा समोर मोटे यांच्याकडून काही वर्षांपूर्वी घेतले क्षेत्र आहे. या क्षेत्रात सध्या बालाजी मंगल कार्यालय तसेच रिलायन्स टावर(काढून टाकला आहे) एलआयसी ऑफिस व बालाजी फर्निचर आहे. रिलायन्स टावर काढल्यानंतर त्या नमूद जागेसमोर रस्त्यावरील काही भाग व टावर काढल्यानंतर खाली शिल्लक राहिलेल्या जागे समोर अनधिकृतपणे गणेश बाबासाहेब भोस व दत्तात्रय गलबले यांनी पत्र्याचे शेड मारून त्याठिकाणी ऑफिस तयार केले आहे.

मोटे यांच्या जागेपैकी काही जागा मागील काही वर्षांत भोस व इतर सहा लोकांनी खरेदी केलेली आहे. मात्र, शेजारी आल्यानंतर संबंधित सर्व जागेवरून भोस वाद घालत होते. यानंतर मोटे यांनी याबाबत माननीय न्यायालय श्रीगोंदा येथे सदर जागेबाबत दावा दाखल केला. बाबासाहेब भोस व त्यांच्या संबंधितांनी अनाधिकाराने ताबा घेऊ नये, कंपाऊंड पडू नये अशा स्वरूपाचा मनाईहुकूम आदेश मा. न्यायालयाने दिलेला आहे. बाबासाहेब भोस त्यांचा मुलगा गणेश तसेच दत्तात्रय गलबले हे मजूर लावून अनाधिकाराने कोर्टाच्या आदेशाचा भंग करून, अतिक्रमण करून, टपरी उभारत होते. यावर त्यांना विचारणा केली असता, त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली.सर्व बांधकाम पाडून टाकण्याची धमकी दिली.

प्रशासना सह प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी बाबासाहेब भोस यांनी पोलिस निरीक्षक श्रीगोंदा यांना शिवीगाळ केल्यावरून त्यांच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल आहेत. राजकीय बळाचा वापर करून, ते आमच्यावर दरहशत करीत आहेत, कोर्टाच्या आदेशास जुमानत नाही, पोलीस देखील दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधितांवर कारवाई करत नाहीत. आम्ही अल्पसंख्याक असल्याने नमूद राजकिय इसमावर कारवाई होत नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी भोस व त्यांच्या साथीदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी मेहथा व मेथा हे दिनांक २८ डिसेंबर रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.

स्रोत:(वैभव मेथा यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading