ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय.

दिनांक १९ डिसेंबर(ढवळगाव,श्रीगोंदा):

श्रीगोंदा तालुक्यातील महत्वपूर्ण समजणारी ग्रामपंचायत ढवळगाव आज दिनांक १९ डिसेंबर २० रोजी ढवळगाव मध्ये गाव बिनविरोध होण्यासाठी गावातील सर्व पॅनल व ग्रामस्थांनी खंडोबा मंदिरासमोर बैठक घेतली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्यामध्ये गावातील सर्वांच्या सहमतीने शासनाने विहित केलेल्या वार्ड रचनेनुसार व आरक्षणानुसार गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व तरुणांनी काही नावं सुचवली त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सर्वानुमते बिनविरोध निवडून दिलेल्या सदस्यांची नावे सौ. प्रतिक्षा विजय शिंदे, सौ. सारिका रविंद्र शिंदे श्री. अजित नामदेव लोंढे, सौ. मनीषा राहुल बोरगे सौ. बायडाबाई गणेश शिंदे, कु. गणेश राजाराम ढवळे, श्री. दादाभाऊ बबन ढवळे, श्री. बाळु सीताराम शिंदे, श्री. अजय दादाभाऊ वाळुंज यामध्ये गावातील सर्व राजकीय पक्षातील गटांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता गावात एकोपा टिकवा. या हेतूने बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मुख्यतः ढवळगावतील मध्यस्तीचे व एकोपा टिकवून ठेवण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते श्री. आप्पा ढवळे आचारी, श्री. अनिल वाळुंज, चेअरमन दादा ढवळे, मा. ग्रामपंचायत सदस्य अमोल बोरगे, गणेश पानमंद मध्यस्थीचे काम तसेच इतर ग्रामस्थ यांनी केली आहे.

याबाबत समजताच ढवळगाव पंचक्रोशीतून ढवळगाव ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. या माध्यमातून सर्व गावांना एकोपाचा संदेश जाणार आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये ढवळगाव आदर्श गाव असल्याचे कौतुक होत आहे.

स्रोत:(पत्रकार अमोल बोरगे,ढवळगाव)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading