दिनांक ३१ जुलै २०२४, श्रीगोंदा/अ. नगर:
दिनांक ९ जुलै २०२४ रोजी माहिजळगांव बायपास, ता. कर्जत येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलेल्या श्री. दिपक दादाराम राऊत यांच्या गाडीसमोर शिवप्रसाद उर्फ बंटी उबाळे आणि त्याच्या साथीदारांनी व्हेरना आणि क्रेटा गाड्या उभ्या करून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून गाडीत असलेल्या ग्राम पंचायत सदस्य श्री. नितीन बन्सी गव्हाणे यांना शिवीगाळ आणि मारहाण करत अपहरण केले.
मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/ श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींना शोध घेतला.
दिनांक ३० जुलै २०२४ रोजी पोनि/श्री. आहेर यांना मिळालेल्या माहितीवरून किशोर सोमनाथ सांगळे आणि इतर साथीदार सिध्दटेक, ता. कर्जत येथे असल्याचे समजले. पोलीस पथकाने घटनास्थळी पोहचून किशोर सांगळे याला अटक केली. त्याच्या माहितीच्या आधारे सागर देमुंडे, प्रतिक उर्फ सनि पवार आणि महेंद्र उर्फ गोट्या गोंडसे यांना देखील ताब्यात घेण्यात आले.
फरार आरोपींमध्ये अमोल भोसले आणि माऊली उर्फ ज्ञानेश्वर उबाळे यांचा शोध घेणे सुरू आहे. सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर आणि मा. श्री. विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





