श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला येथे बंगल्याचा दरवाजा तोडून २३ लाखांची चोरी..

दिनांक २६ जुलै २०२३,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणाऱ्या सांगवी दुमाला गावातील नलगे वस्तीवर मध्यरात्री बंगल्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी पंचवीस तोळे सोने व साडेपाच लाख रुपये रोख, असे सुमारे तेवीस लाखांची धाडसी चोरी करुण चोरटे पसार झाले आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सविस्तर माहिती अशी की दिनांक २४ जुलै २०२४ रोजी तालुक्यातील सांगवी दुमाला येथील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव नलगे यांचे शेजारी भाऊबंद साहेबराव एकनाथ नलगे यांच्या बंगल्यातील किचनचा दरवाजा मध्यरात्री तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. तेव्हा कुटुंबातील मोठा मुलगा लक्ष्मण हे पतीपत्नी दोघे बेडरूमऐवजी हॉलमध्ये झोपले होते.

चोरट्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटातील वस्तुंची उचकपाचक करून त्यातील महिलांचे सुमारे पंचवीस तोळे सोने व दोन दिवसापूर्वी शेतातील कांदा विकून आलेले साडेपाच लाख रुपये रोख, अशी एकूण तेवीस लाख रुपयांची धाडसी चोरी करुन चोरटे पसार झाले. सकाळी घरातील महिला लवकर उठल्यानंतर सर्व प्रकार त्याच्या निदर्शनास आल्यावर समजले की, आपली चोरी झाली आहे. त्यानंतर ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव नलगे यांनी घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना दिली.

श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक समीर अभंग हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. चोरीचे गांभीर्य ओळखून कर्जतचे पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, तसेच नगरहून श्वानपथक व ठसे तज्ञ यांनी येवून घटनास्थळी पाहणी करित माहिती घेतली. परंतु रात्रभर पाऊस जास्त असल्यामुळे श्वानाला काहीच मार्ग सापडला नाही. चोरट्यांचे ठसे मात्र मिळाले आहेत. भर वस्तीमध्ये चोरट्यांनी केलेली धाडसी चोरी पोलिसांना आव्हान देणारी आहे.

लक्ष्मण साहेबराव नलगे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर, पुढील तपासाची चक्रे श्रीगोंदा पोलिसांनी हलविली असून, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला आहे.

स्रोत:(फिर्याद)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading