हिरडगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार..वारंवार होत असलेल्या अत्याचारानंतर पीडिता गरोदर…

दिनांक १४ डिसेंबर(हिरडगाव, श्रीगोंदा):

तालुक्यातील हिरडगाव येथील अल्पवयीन मुलीवर मागील नऊ महिन्यांपासून एक नराधम अत्याचार करीत असल्याची घटना समोर आली आहे. मुलगी आंघोळ करतांना त्याने चोरून काढलेली व्हिडिओ चित्रीकरण सार्वत्रिक करून तुझी बदनामी करिल, अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर अनेकदा शरीर संबंध बनवून अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडगाव येथे इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या या पिडीतेच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या रामदास मोरे या इसमाने पीडित मुलीचे आंघोळ करतानाचे फोटो आणि चित्रीकरण मोबाईल मध्ये केले होते. त्याचा आधार घेऊन त्या मुलीला त्याच्या घरात कोणी नसताना तिला बोलावुन तिचे अंघोळ करतानाचा व्हिडीओ दाखवला . मी सांगेल तसे करायचे अन्यथा, तुझी व्हिडीओ शूटिंग सर्वांना पाठवीन. म्हणत, तिला अंगावरची कपडे जबरदस्तिने काढून तिच्याशी शरीरसंबंध करून अत्याचार केल्याचे पिडीतेने सांगितले.

यातून तिला दिवस गेल्याचे त्या मुलीच्या आईच्या निदर्शनास असल्यावर त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात काल दिनांक १३ डिसेंबर रोजी रामदास मोरे याच्या विरोधात भादवि कलम ३७६(२)(l), ३७६(२)(j), ३७६(२)(n), ३५४(c), ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३,४,७,८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजाराम ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल तक्रार).

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading