अट्टल गुन्हेगार श्रीगोंदा पोलिसांनी केले जेरबंद..एक लाख तिस हजार रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..

दिनांक १४ डिसेंबर(पिसोरे खांड,श्रीगोंदा):

दिनांक ८ डिसेंबर रोजी पिसोरेखांड शिवारात इंगळेवस्ती या ठिकाणी अनोळखी चोरट्याने घरात प्रवेश करुन, फिर्यादीस दमदाटी करीत फिर्यादीस धारधार हत्याराने मारहाण केली. तसेच, बळजबरीने सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.

त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. २०४०/२०२० भा.द.वि.क ४९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास चालु असताना दिनांक ९ डिसेंबर रोजी पोनि. रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोळगाव शिवारात जबरी चोरी केलेले आरोपी आहेत. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देवुन त्यांना रवाना करुन कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील अट्टल आरोपी उदाशा लालदाश्या भोसले वय ५२ वर्षे, अतुल उदाशा भोसले वय १९ वर्षे व एक विधिसंघर्षित बालक सर्व रा.कोळगाव ता.श्रीगोंदा यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी श्रीगोंदा पोस्टे गु.रजि.नं. २०४०/२०२० भा.द.वि.क. ३९४, ३४ गुन्ह्याची कबुली दिली आहे .

https://bit.ly/bspmycityshrigonda

सदर आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेले ३०,०००/- रु. किंमतीचे सोने व एक चाकु हस्तगत करण्यात आले आहे.सदर आरोपींविरुध्द यापुर्वी तळेगाव दाभाडे, आळेफाटा पुणे ग्रामिण, नगर तालुका, पारनेर, बेलवंडी पोलीस स्टेशन येथे दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच, रेकॉर्डवरील सराईत मोटारसायकल चोर बापु साहेबराव कव्हाणे वय २३ वर्षे, रा.घोसपुरी ह.मु.काष्टी ता.श्रीगोंदा यास काष्टी येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन सुमारे एक लाख रुपये किंमतीच्या एक युनिकॉर्न व एक स्प्लेंडर अशा दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत . तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. १७६७/२०२० भा.द.वि.क. ३७९ मधील गुन्ह्यात चोरलेल्या मोटर सायकलची कबुली दिली आहे.

युनिकॉर्न मोटार सायकल चोरीबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुर.रजि.नं. ६०८७ / २०२० भा.द.वि.क.३७९ प्रमाणे दाखल आहे . सदर आरोपी विरुध्द अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई (पोलीस अधिक्षक) मनोज पाटील,(अप्पर पोलीस अधिक्षक) सौरभकुमार अग्रवाल,(उपविभागीय पोलीस अधिकारी) अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, (सपोनि दिलीप) तेजनकर, (सपोनि) विठ्ठल पाटील, (सफो) भानुदास नवले, (पोहेकॉ) अंकुश ढवळे, (पोकॉ) प्रकाश मांडगे, (पोकॉ) संजय काळे, (पोकॉ) गोकुळ इंगवले, (पोकॉ) दादा टाके, (पोकॉ) किरण बोराडे, (पोकॉ) योगेश सुपेकर यांनी केली आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading