दिनांक १५ डिसेंबर, श्रीगोंदा:
शिवसेना अ.नगर (संपर्क प्रमुख) भाऊ कोरगावकर, शिवसेना (जिल्हाप्रमुख) शशिकांत गाडेसर व शिवसेना (महीला आघाडी अ.नगर संपर्क प्रमुख) अश्विनीताई मते यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना महिला आघाडी (जिल्हाप्रमुख) आशाताई निंबाळकर, युवासेना (जिल्हाप्रमुख) रविभाऊ वाकळे, युवासेना (उपजिल्हा प्रमुख) बाळासाहेब दुतारे यांच्या हस्ते शिवसेना श्रीगोंदा महिला आघाडी (तालुका प्रमुख पदी) मनिषा ताई काळे यांना नियुती पञ देण्यात आले. तसेच, जनाबाई गायकवाड (उपतालुका पदी प्रमुख) महिला आघाडी यांची निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना (शहरप्रमुख) संतोष खेतमाळीस, शिवसेना (उपतालुका प्रमुख) संतोष शिदे, युवासेना (तालुकाप्रमुख) हरिभाऊ काळे, शिवसेना (तालुका संघटक) नंदकुमार ताडे, नाथा पवार, युवासेना (शहरप्रमुख) ओमकार शिदे उपस्थित होते.
स्रोत:(बाळासाहेब दूतारे)
