दिनांक १५ डिसेंबर,श्रीगोंदा:
राज्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी ज्येष्ठ तसेच माजी मंत्री,मुख्यमंत्री यांची निवड होते.परंतु, संघटन कौशल्य पाहून काँग्रेसचे श्रेष्ठी खासदार राहुल गांधी यांनी श्रीगोंदा तालुक्याचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य हेमंत ओगले यांची गुजरात राज्याचे प्रभारी पदाची जबाबदारी दिली.

हा तालुक्याचा बहुमान असल्याचे गौरवोद्गार माजी उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे यांनी श्रीगोंदा येथे युवक काँग्रेस बैठकीत बोलताना काढले.गोरे पुढे म्हणाले युवक काँग्रेस माध्यमातून कार्यकर्त्यांनी युवकांची मजबुत फळी निर्माण करावी कामातून संधी मिळते.हेमंत ओगले यांनी पंचायत समिती मध्ये तर त्याच वेळी आपण उपनगराध्यक्ष पदावर काम करताना संपर्क आला त्यांची काम करण्याची पद्धत पक्षात मोठे पद मिळवून देणारी ठरली.
हेमंत ओगले म्हणाले राज्यात श्रीगोंदयात काँग्रेसचे नेते कोण ? हा प्रश्न विचारला जातो. कारण आज काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसणारे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर विराजमान दिसतात. पण, मी युवक काँग्रेस माध्यमातून कामास सुरुवात केली.निष्ठावंत राहिलो पक्षाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. दुर्दैवाने तालुक्यातील नेतेमंडळीनी सहकार्य केले नाही. पण, आपण काम करत राहिलो. पंचायत समिती सदस्य असताना विरोधकांचेही प्रश्न सोडविले,५६७ घरकुल मंजूर केली. पुढे पक्षाने श्रीरामपूरला लक्ष घालण्यास सांगितले. विविध राज्यात जबाबदारी दिली.आता कार्यकर्त्यांनी आगामी आमदार युवक काँग्रेस ठरवील असे संघटन करा सर्व मदत देऊ. असे सांगून, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे निम्मे मंत्री युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यांच्या उपस्थितीत श्रीगोंदयातील मेळाव्यात गुजरात प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल हेमंत ओगले यांचा युवक काँग्रेस वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रशांत ओगले, संतोष रोडे, प्रशांत सिदनकर, पवन मोहिते आदींची भाषणे झाली आभार किरण बंड यांनी मानले.
स्रोत:(राजू गोरे)
