कळा, उत्तम बंडू तुपे(भाग २९).

कळा, उत्तम बंडू तुपे..

दाखल केली . पाण्यागत रुपयं खर्ची पाडलं ; तवा ही लोची नीट झालीय . तुझ्या पुढ्यात बसलीय ती लोची , तुझी बायकू हाय . “ धनी ! हे खरं हाय का सपान हाय कायबी कळना झालंय . ‘ काळा ; दुष्काळातला माणूस भुकंनं यडबड उठून अन्नावर पडावा ; तसं झालं . उठून लोचीला मिठी माराय लागलो ; तर लोची मागं सरली . मांडीवरच्या कवळ्या पोराला पोटासंग धरून उभी राहिली . उतावळा हून मी तिच्याकडं धावलो . “ मागं हूं ; पुढं येऊ नगस . कोण तू ?

https://bit.ly/bspmycityshrigonda

” लोची गुरकली . डोळवानं ताणून माझ्याकडं बघाय लागली . “ मी ; मी तुझा संतू गं ! तुझा नवरा . “ गेला चुलीत नवरा . “ धनी ! हे काय ? लोची आजून नीट झाली न्हाय . मला वळखत न्हाय ती . ‘ “ वळख तुझी मोडलीय ; माझी न्हाय . आता माझं टक्कूरं ठिकाणावर हाय . ” मंग आसं का बोलती ; लोचेऽऽ आसं बोलू नगसं . ” ‘ ज्या दिसी मला याड लागलं ; त्या दिसी माझी सगळी नाती मेली . मला पोरं न्हायती . नवरा न्हाय . कुणी कुणी न्हाय मला . धन्यानं मला दवाखान्यात टाकलं नसतं ; तर मी तुला दिसली नसती . ” ” लोचे ! आता मागचं कायबी काढू नगस . आपल्या घरी चल ; मंगल आलीय . तिच्यासाठी तू याड लावून घिटलं हुतंस . चल . तुझं सगळं अणेव पदरात घालतो . ” ” तू कोण ? मी वळखत न्हाय . मंगल कोण मला ठावं न्हाय . लोची बोलली . तोंडात बोळा घाटल्यागत झालं . काय बोलावं ; काय सुचत नव्हतं . अंब्याची गार सावली देहीला भाजत हुती . देही गार गार व्हत चाललेली .

सगळा जीव नखांत गोळा झाला . घोरपडीगत नखं मातीत रुतवून उभा हुतो . एकदा लोचीकडं ; एकदा नारायण चव्हाणाकडं बघत हुतो . नारायण चव्हाण निर्विकार होऊन नुसता थंड डोळ्यानं बघत हुता . त्याच्या डोळ्यांतल्या गुजा आजून तशाच पिकलेल्या दिसत हुत्या . खण खण ऐरणीवर घण घातल्यागत झालं . हुर्दची काहील झाली हुती . लग्नाची बायकोच उलटली हुती . सगळा मळाच उलटा फिरला हुता . माझ्या बळावर वाढलेला ; मोठा झालेला मळा . निम्मी हयात या मळ्यात खपवली . त्या मळ्यानंच मला संपवलं . खरंच ; सगळंच हातातनं गेल्यासारखं झालं .

ज्या लोचीला तळहातातल्या पोडावानी सांभाळली ; जिवाला जीव लावला ; आपलं पोट मारून तिचं पोट भरलं ; तिच्यासाठी लई जीव जाळला ; कवा चैन केली न्हाय ; हौसमौजचं धडूत कवा अंगावर घातलं न्हाय ; का”तिला सोडून घास खाल्ला न्हाय ; ती लोची आसं बोलली . शिसं तापवून कानांत ओतल्यागत वाटायला लागलं . वैरी झालेला मळा वाघागत नखं काढून उभा राहिल्यागत डोळ्यांपुढं दिसायला लागला . तरी शेवटाचं बोललो . ” लोचे ! मंग तुझा – माझा संबंध न्हाय रायला ? ” ” काय संबंध न्हाय तुझा – माझा . ” हे तू इचार करून बोलतीस लोचे ? ” “ म्या सगळा इचार केलाय . ” ” मंग ; जाऊ का मी ? ” “ म्या तूला ये म्हणून सांगितलं नव्हतं ; तसं जा म्हणून कसं सांगू ? तू मोकळा 7.7 हायस . पायाला शिळा बांधल्यागत पाय जडशिळ झालं हुतं . एक एक पाय मिन्नतवारीनं उचलत हुतो .

सगळी आशा मेली हुती . जगायसारखं काय रायलं नव्हतं . माझीच नखं माझ्याच पोटात खोलखोल शिरत चालल्यासारखं वाटत हुतं . हळूच अंब्याच्या सावलीतनं बाहेर पडलो . सुया शिरल्यागत उन्हाच्या झळा देहीत शिरल्या . जिवाला कसणूसी कळ लागली . देहीतला जीव एका जागी गोळा झाल्यागत देहीतल्या सगळ्या शिरा ; दोऱ्या अकळून धरल्यागत वाटायला लागलं . पुढंच काय बी दिसत नव्हतं . खोल खोल अंधारांत डूब मारून बसल्यागत झालं हुतं . कुठं चाललोय ? दुबळं झालेलं पाय कुठं घेऊन निघालेत ? पायाखाली वाट नव्हती . भुईत उठलेलं खडं , काट , काटक काटेरी झुडपं तुडवत भान नसल्यागत चालत हुतो . लांब कुठं तरी जात हुतो . खालनं भुईतली धग ; वरनं उन्हाच्या झळा . दोन्ही बाजूनं जळत हुतो . माझं जळणं ; मलाच दिसत हुतं . भिरूड लागलेल्या झाडागत वरनं टवटवीत दिसत हुतो . लांब लांब गेल्यावर मागनं कुणीतरी आलं . हाताला धरलं . तवा माघ फिरून ध्यान देवून बघिटलं . “ बापू ! हिकडं कुठं ? ” –

दुर्व्या . ” पोरा घरी निघालोय ; माझ्या घरी . ” बापू ! आपलं घर हिकडं न्हाय . ‘ ‘ दुर्व्या ! मी माझ्या घरी निघालोय ; तू तुझ्या घरी जा . मंगलवर माया आसू दे . लोची तुझी आय हाय ; तिला सांभाळ . ” मानात येत हुतं ; तसा बोलत हुतो . दुर्व्या नुस्ता माझ्याकडं डोळं लावून उभा हुता . त्यालार्बी भडभडून आल्यागत दिसत हुतं . ” ” बापू ! आय मडी हून गेली . तूबी आसा करायला लागला तर आमी कुणाच्या अधारानं उभं रायाचं ? “आवळून गावाकडं वळलो तवा कडूस पडल हुत . हुमदऱ्याच्या टेकाडावरनं गाव भर्र करून डोळ्यांपुढचा कावळा उडून गेला . दुर्व्याला पोटासंगट धरलं . तवा माया रडत हुती . अंतकरण पार पाघळून गेलं हुतं . बघितला ; गाव झगमगत हुतं . आवसं – पुणवला भुतं नाचावी ; तसं इजंच दिव दिसत हुतं . गाव भुताचं झाल्यागत वाटलं .

माणसं खाऊन जगलेली भुतं ; गावात त्यांचा जार . आता या गावात राम न्हाय ; वाटायला लागलं हुतं . दारात आलो तर दारातलं सावलीचं झाड मुळ्यातनं उलथून पडलं हुतं . मातीतल्या मुळ्या वर झाल्या हुत्या . मातीपासून परकं झालेलं झाड . त्याच्या मुळ्यांला मातीबी नव्हती . दाराला पाय लावून मंगल बसली हुती . लांब तिकडं पेटलेल्या इजच्या दिव्याचा उजेड तिच्या अंगावर पडला हुता . घरांचाबी अर्धा भाग त्या उजेडात उठून दिसत हुता . मंगल सुख मारून बसली हुती . तिला हे तोंड दाखवायला नगं ; वाटत हुतं . तरी तिनं तोंडाकडं बघिटलं . ‘ बापू ! तोंड कशानं सुमारलंय ? काय झालं तोंडाला ? ” काय सांगू ; खिनभर गप झालो . उशिरानं मनातलं मनात दाबून बोललो . ” पडलोय . ‘ ” कुठं पडला बापू ? लई लागलंय ; रगतबी निघालंय . ” मंगल रक्ताची नाती बेइमान झाली की रगत सांडतं बघ . ” मजी ? ” ‘ काय न्हाय ; आसंच बोललो . ‘ सगळं सांगावं वाटत हुतं .

म्हणताना मन उसळत हुतं . तरी मनाचा उसाळ आतले आत दाबून धरत हुतो . आदनावरच्या झाकनागत उराचा पिंजरा हालत हुता . गरीब झालेली नजर मंगलवर थिर झाली हुती . गरीब नजरखाली मंगल कावरीबावरी झाली . ” बापू ! बघू दया तरी काय लागलंय . ‘ ‘ काय न्हाय पडलोय ; लागलं आसंल उलीसं . काय व्हत न्हाय .

” ” उलीसं कसलं ? लई लागलेलं दिसतंय . कानसूल फुटलंय की बापू , मंगल हळहळून बोलत हुती . काणसुलावरनं अलवार हात फिरवत हुती . तसं कळा मेल्यागत वाटायला लागलं हुतं . ” बापू ! खोटं सांगताय . तुमी पडला न्हाय . ” खरंच पडलोय ; मी ठेचकाळून पडलो . ” न्हाय ; कुणी तरी मारलंय . कुणी मारलं ? ” “” ” मंगल इचरत हुती . तसा दुर्व्याबी दुजोरा देत हुता . त्यानं माझं थोबाड दळांतात धरलं हुतं . “ बाऽपू ! कुणी मारलं ? कुणी हात टाकला माझ्या बापूच्या अंगावर ? बाऽपू ! त्याचं नांव सांगा . ‘ दुर्व्यानं माझी फिरवायची काठी खस करून उपसली . “ सांगा बापू ! त्याचं नाव सांगा . त्याचा मुडदा पाडल्याबगार थांबत न्हाय आता . ‘ हळूच दुर्व्याच्या हातांतली काठी काढून घिटली . बाजूला टेकून ठेवली .

https://bit.ly/bspmycityshrigonda

“ दुर्व्या ! धोंडा पायांत आला म्हणून त्याच्यावर टक्कूर आपटलं तर आपलंच टकूर फुटणार . “ बापू ! त्या धोंड्याला उचलून टाकला तर ? मला नाव सांगा त्याचं . ” दुर्व्याला कुठलं बळ आलं हुतं कुणाला ठावं ! रगीतल्या खोंडागत नुसता नाचता हुता . याचं बळ बघून मन फुलारलं हुतं . त्याच्यातलं दुबळंपन कशानं मेल हुतं काय कळत नव्हतं . “ मंगल ! ढणूक लागलाय ; काय तरी लावाय पायजी ; काणसुलांत जीव आलाय . “ काय घालू बाऽपू ? ” ” बिबा हाय का बघ . नितान कळ तरी मरंल . ” ” बिबा तोंडावर घालायचं बाऽपू ? ” ” काय व्हत न्हाय ; कळ मरतीय त्यानं . ” “ नग ; काय तरी इपरीत व्हयाचं . “ काय व्हत न्हाय ; आण मी घालून घेतो माझ्या हातानं . ‘ दोन बिबं घिटलं ; चांगलं चेचून तेल काढलं . नाक – कानसुलावर बिब्याचा लेप घातला . चांगलं रसरसीत इंगळावर तोंड शेकलं ; तवां निवांत झोप लागली .

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading