कळा, उत्तम बंडू तुपे..
दोन रोज बिब्यानं थापलेलं कानसुल – थोबाड शेकत हुतो . तस्या कळा मारत हुत्या ; पर सगळं थोबाडकानसुलं डोळवान , डोळ्यांची बुभळं . दगाड बांधल्यागत जड जड वाटायला लागली हुती . डोळ्याला अंधुकी येत चालली हुती . धुरकट धुरकट दिसंयला लागलं हुतं . डोळ्यातनं सारखं पाणी झिरपत हुतं . ऐना घेऊन ऐन्यात तोंड न्याहळून बघिटलं . तोंडाचं मडकं झालं हुतं. सगळ्या तोंडावर बिबा उतला हुता . डोळवानासकट डोळ्यांची बुभळंबी सुमारली हुती . सगळं थोबाड गदगद शिजवल्यागत झालं हुतं . खाज तर आसली सुटत हुती . सारखं जाळापुढं तोंड धरून बसावं वाटत हुतं .
खाज सुटंल तसं खसाखसा चोळत हुतो; खाजवत हुतो. चोळून, खाजवून तोंडावरचं फोड फटाफट पाण्यावरचं फुगं फुटल्यागत फुटत हुतं . त्यातनं पिवळं पाणी झिरपायचं . तिसऱ्या – चौवथ्या दिसी डोळ्याच्या बुभळावर वसाडं वाढल्यागत फोड आलं . तसी नजर बंद झाली . जिकडं तिकडं काळामिठ अंधार आसल्यागत झालेलं . “ दुर्व्या ! दिस उगवला ; आजून उजाडलं का न्हाय ? ” ” बापू ! दिस दुपारीला की आलाय . ” सुरुंग उडाल्यागत पोटात डबरा पडला . घाबरा हून हातानं डोळवानं चाचपली .

डोळ्यातनं पाणी झिरपत हुतं . कसणूस चिकट , बिळबिळत पाणी हाताला लागलं . “ गेलं वाटतं डोळं . “ काय बापू ; डोळं गेलं ? ” ” आसं वाटतंय ; कायबी दिसत न्हाय . मंगल आन् दुर्व्या जवळ आली . त्यांनी मिठ्या मारल्या . फासात पडलेल्या हरणागत आरडली पोरं . ” बाऽपू ! आता काय करायचं ? हातानं डोळं घालवून घिटलस तू . ‘ पोरं वरडत हुती . त्यांच्या पाठणीवरणं हात फिरवत हुतो . उगा हाय म्हणाय पुरता धीर देत हुतो . ” बापू ! आता काय करायचं ? ”
” काय न्हाय ; तरवट्याचा पाला टेचून त्याचा रस लावा बघू ; काय व्हतंय . डोळ्याला सूज आली आसली तर बरं हुतंय त्यानं; बिबा उत्तला तर तरोट्याच्या रसानं बरा हुतो … ‘ ” बापू , तू चांगला हो . तुला दिसयला लागलं की आपून गाव सोडू . ‘ “ दुर्व्या ! तू माझा घोर करू नगस . रोजगाऱ्याला कसलं आलंय गाव – वतन ? काय बी नसतं . ममईला आपली माणसं हायती. तू जा . तुका , मव्हन , सिरपंत यांच्यातलं कुणीबी कामाला लावंल तुला . चार बुकं शिकला त्याचा फायदा ” करून घे . ” ” ” बापू या हालाकीत तुला टाकून जायाचं ? अक्काबी अवघडून बसलीय . ‘ ” तिचाबी घोर करू नगस ; सिरपत तिला संभळलं.
भेटली लोची तर आय म्हणून तिलाबी संभाळून घ्या . ‘ आत्ता आय न्हाय भेटायची . येडाच्या नादात कुठं तरी भटकत आसलं . ” मनात आलं ; सगळं सांगून टाकावं . पर पुन्हा मनाला मुरड घाटली . कळ दाबून गप बसलो . आत पोटात भडका उठला हुता . त्याला वर येवू देत नव्हतो . आठ दिसानं थोबाड पयल्यागत झालं . खाजबी सुटत नव्हती . तरुढ्याच्या रसानं गुण आला . पर आठ दिसांत उजेड कवा दिसला न्हाय . आता काळोखात झालेला जलम काळोखात जाणार वाटायला लागलं . मरणात उठून जगलो . ते मरणासाठीच ! पर हे आसं जितं मरण कवा बघतिलं नव्हतं ; ते बघत हुतो . खोल खोल अंधाराच्या तळातला काळोख आता डोळ्यात वस्ती करून राहिला हुता . पाझरून पाझरून डोळ्याच्या खाचा खोल खोल चाललेल्या . डोखंच खाऊन ” टाकलं म्हणताना भूकबी लागत नव्हती .
कवा भूक लागली तरी कुणाला भाकरी मागत नव्हतो . मंगल रोज सकाळचं खा म्हणून भाकरी पुढ्यात मांडत हुती . पर पोटात घास उतरत नव्हतं . फासावर टांगल्यासारखं वर थोबाड करून बसत हुतो . चिलटं माशा डोळ्याच्या खाचांत शिरून चावायला लागली की हात हालवून हुसकत हुतो . फटाफट डोळवणावर तडाखं बसत हुतं . “ मंगल ! दुर्व्या गेला का ? ” ” गेला की कामाला . ” सिरपतची काय खबर बातमी ? ” “ टपाल आलंय त्यांचं . ” ” लोचीचं काय कळलं का ? ‘ ” बापू ! आता तिचं काय कळणार ? तिच्या पायांत तर घर बुडलं . ” “ न्हाय लेकी ; तिला दोश देऊ नगस . आईचं हुई आई झाल्याबगार तुला कळणार न्हाय . तू निघून गेली तवा तिनं हंबरडा फोडला . पोरी , ती तुझी आय हाय . ” बापू ! हे माझ्यामुळं झालं व्हय ? ” ‘ न्हाय लेकी ; हे हुयाला तू – मी – लोची ह्यापैकी कुणीच कारणीभूत न्हाय ; याला कारण माणुसकी हाय . माणसांत माणुसकी पायजी .
ती सिरपतनं दाखवली . त्यानं पैसा – इष्टक ह्याच्या पल्याड नजर टाकली . ज्याला लेकी हायत्या ; त्यानं खेड्यांत आपल्या गावात राहू नाय . गावात रोजगार मिळतो ; पर रोजगारांचं रुपयं टिकत न्हायतं . लेकीच्या लग्नाला , लेकाच्या शिक्षणाला पैका अपुरा पडतू . आता खेडी , खेड्यांतली रीतबी बदलली . वाण्याबामनांगत लेकांचं बाप, लेकीच्या बापाला हुंडा मागत्यात. दरोडेखोरानं खंडणी मागितल्यागत वाटतयं यांत. माया, ममता कुठं हाय ? ” लई बोलायचं हुतं ; पर बोलवत नव्हतं. कुठं तरी सास आटत हुता . म्हणताना लांबनं पळून आल्यागत दम भरत हुता ; धाप लागत हुती . म्हणताना मंगलनं आथरून टाकून दिलं . ” बापू ! गप पडा बरं ; जिवाला बरं न्हाय तुमच्या . ” गप अंथरुणावर पडलो हुतो .
वाचन ऐरगेट होम रात्रिसरखण मागितले. डोळ्यांत गुंडाळा धूर संपूर्ण वाटायला लागलं. तवा आयन्शाऊं। उठलो; तवा वन फासफुसे आवाज. “कोण हाय मंगल?” “बापपू! “मंगळवार आपण भेदरलेली. ‘काय मंगल मंगल? ” ” बापू! गावंड्रीच्या वढ्या काटकं वेचत हुते … “मंग काय? “खडमले किशोरानं मागितलं मला कावला घाटला.” कोण – किशा? धोंडी कारभाअरिंग पोरगा? “” व्हय; तेनंच कवळा घाटला. “मंगळ हो ते भारी हुता – परीणाम पालथा. “म्या त्शंच. लई माजलेती ही लोक. मूल्यसनी आसंच तयजी। “” बापु कुत्र्यागत पलाला. ” अंथरुमणीय उठो. टेक द्यावयाची काठी चाचपून घिटली नि चाचपडत चाचपडत बाहेर पडलो.

‘ बापू कुठं निघालाय ? ” “ थांब ; त्या किशाला बघतो . हुरड्यागत बडवून काढतो . ” ” आत्ता रात व्हईल ; बापू तुमाला दिसत न्हाय . मंगल आरडून सांगत हुती नि मी चाचपडत चाललो हुतो . हातातली काठी पेलून पवित्रं टाकत हुतं . ‘ किशा ये , तुझा मुडदाच पाडतो ‘ म्हणून किशाला आव्हान देत हुतो . “
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
कळा कादंबरीचा हा शेवटचा भाग संपन्न झाला.
या कादंबरीचे सर्व भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
