आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आदिवासी महिलेचे पोलिसांनी वाचवले प्राण..पोलिसांचे उपस्थितांकडून अभिनंदन..

दिनांक १६ डिसेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशनला घरगुती वादातून फिर्याद देण्यासाठी आलेल्या आदिवासी महिलेने तहसील कार्यालयाच्या आवारात झाडावर चढून आरडाओरडा करीत, अंगातील साडी सोडून, झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. बघ्यांची गर्दी जमली.मात्र,कोणीही तिला आडवन्याचा प्रयत्न केला नाही. ही घटना रस्त्याने जाणाऱ्या एका पोलीसाच्या निदर्शनास आल्याने,त्याने नमूद ठिकाणी धावत जात त्या महिलेला ताब्यात घेतले.या पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सविस्तर असे की,श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आलेला एका आदिवासी महिलेने पोलीस स्टेशन मधून अचानक बाहेर पळत तहसिल कार्यालयाच्या कंपाऊंड गेट शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडावर चढून अंगातील साडी सोडून मी आता माझे जीवन संपावणार आहे. मला त्रास होत आहे. प्रशासनाने माझी दखल घ्यावी असे म्हणत गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर बाब श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल समीर सय्यद व हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे यांनी पाहील्यानंतर अक्षरशः पळत जाऊन सदरील महिलेला ताब्यात घेण्यात आले.नमूद ठिकाणी जाण्यास जर वेळ झाला असता.तर दुर्घटना घडली असती.

यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर महिलेला ताब्यात घेतल्याने, त्या महिलेचा जीव वाचला अन्यथा त्या महिलेने गळफास लावून घेतला असता. अशी लोकांची चर्चा चालू होती.त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल समीर सय्यद व हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे यांच्या कर्तव्यदक्षते बद्दल उपस्थितांनी अभिनंदन केले आहे.

स्रोत:(घटनास्थळावरील चित्रकरण)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading