श्रीगोंदा – जळगाव बसखाली येऊन औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू..

दिनांक १४ डिसेंबर, श्रीगोंदा/औरंगाबाद:

श्रीगोंदा आगारातील, श्रीगोंदा जळगाव ही बस प्रवासादरम्यान १ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथून पुढे जात असताना, अचानक बसच्या चाकाखाली येऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल प्रेसिडेंट नजीक ही दुर्घटना घडली होती. बसच्या चाकाखाली आलेल्या व ठार झालेल्या व्यक्तीची एमआयडीसी पोलिस स्टेशनला मिसींग दाखल झालेली होती. सुधाकर साहेबराव खैरनार (वय-३८) रा. सुप्रिम कॉलनी असे ठार झालेल्या व्यक्तीने नाव आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याबाबत सविस्तर वृत्त असे की, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली ते रेमंड चौफुली दरम्यान हॉटेल प्रेसिडेंट नजीक जळगाव – श्रीगोंदा (एमएच ११ बीएल ९३८५) ही बस भरधाव वेगाने औरंगाबादच्या दिशेने जात होती. त्या बसच्या चालकाच्या बाजुकडील चाकाखाली एक इसम चिरडला गेला होता.

त्यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक इमरान सय्यद व गोविंदा पाटील असे दोघे कर्मचारी गस्तीवर होते. त्यांनी बसच्या चाकाखाली आलेल्या अनोळखी इसमास तात्काळ वैद्यकीय उपचारार्थ देवकर रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले होते. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला बस चालकाविरुद्ध भादवि कलम २७९, ३०४(अ) व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्रोत:(लाईव्ह ट्रेंड्स न्यूज)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading