‘शब-ए-बारात’निमित्त घरीच नमाज पठण करा.

दिनांक ९ एप्रिल,श्रीगोंदा:

मुस्लिम समाजासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘शब-ए-बारात’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने मुस्लीम समाजाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, शहरातील कब्रस्तानजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याने सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करन्याचे आवाहन श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी मुस्लिम समाज बांधवांना केले आहे.

करोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने शासकीय निर्देशांचे पालन करावे. कुणीही घराच्या बाहेर पडू नये. अगदी अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवल्याने त्याठिकाणीही गर्दी करू नये.असे यावेळी सूचित करण्यात आले.

या विषयावर चर्चा करण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू मैलाना मोहिनुद्दीन अत्तार व मुस्लिम समाजाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून असिफ पठाण यांच्याशी प्राथमिक स्वरूपात पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी चर्चा केली.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading