दिनांक १० एप्रिल,श्रीगोंदा:
शहरातील सद्भावना आनंद सेवा मंडळाकडून शिवभोजन थाळीच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत,कोरोणा साथीत उदभवलेल्या आपत्तीमध्ये गरीब व उपेक्षितांची अन्न पाण्याविना होणारी दुर्दशा लक्षात घेऊन.त्यांना पोटभर अन्न मिळावे,या उद्देशाने हा अन्नदानाचा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे,संचालक सोमनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले आहे.
कोरोणा साथीने सर्व जगभरासह देशातही मोठा हाहाःकार माजवला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून,राज्य व केंद्र शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून,लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.सर्वत्र बंद असल्यामुळे साधारण कुटुंबातील लोकांचे मात्र, उपजिवीकेचे प्रश्न उद्भवू लागले आहेत.आशा हातावर पोट असलेल्या लोकांसाठी शासनाने यापूर्वीच सुरू केलेल्या शिवभोजन थाळीच्या माध्यमातून शहरातील सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्यांनी एकत्रित येत,उपेक्षितांना अन्नदान करण्याचे ठरवले आणि त्यातून हा समाजसेवेचा स्तुत्य उपक्रम उभा राहिला आहे.
सद्भावना आनंद सेवा मंडळच्या या उपक्रमामध्ये शिवनाथ प्रभाकर शिंदे,सतीशशेठ पोखरणा, आनंद कटारिया,गणेश बिडवे,संतोष क्षिरसागर (नगरसेवक),गौतम पटवा,चंद्रकांत लोखंडे, महावीर पटवा(नगरसेवक),महेशआंबीलवाले , धनेश गुगळे इत्यादी कार्यकर्ते सक्रिय आहेत.

७५ लोकांची मर्यादा असतांना पहिल्या दिवशी १५० पेक्षा जास्त लोकांना अन्नदान करण्यात आले आहे.श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी उद्घाटनप्रसंगी नमूद उपक्रमाचे हार्दिक स्वागत करत,शुभेच्छा दिल्या आहेत.
