दिनांक २८ मे (श्रीगोंदा फॅक्टरी,श्रीगोंदा):
तीन दिवसांपूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी येथे घोरपडी, पुणे येथून एक इसम आला होता. त्याला श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने,तपासणी साठी गेलेल्या काष्टी येथील डॉक्टरने त्याला श्रीगोंद्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते.या नंतर त्यास अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले होते.
त्याच्या संपर्कात आलेल्या १४ जणांचे अहवाल तपासणीमध्ये निगेटिव आले होते. मात्र, यातील एका दहा महिन्याच्या बाळाचा तपासणी अहवाल अनिर्णित असल्याने, पुन्हा तपासण्यात आला होता. त्यात त्या मुलाचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी माध्यमांना सांगितले आहे.
आज दुपारी या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुलाची आई व मुलास जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आले असून, उर्वरित १२ जणांना श्रीगोंद्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.
