पोलिसांनी घेतलेले ५७ हजार रुपये परत द्या ! अन्यथा १ जून पासून आमरण उपोषण करणार : उमेश वेताळ..

दिनांक २९ मे,श्रीगोंदा:

दिनांक १७ मे रोजी,श्रीगोंदा हद्दीत घोडेगाव रोड वर,लग्न कार्यासाठी दोन जण तलवार घेऊन जात असतांना, स्थानिक पोलीसांनी सापळा लावून पकडले होते. त्यांना पोलीस नाईक वैराळ यांनी ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली. भीतीपोटी आम्ही लिंपणगावच्या उमेश वेताळकडे सेंट्रिंगचे काम करत आहोत. असे सांगितल्यावर पोलीस नाईक व्ही.आर.वैराळ यांनी मला या केसमध्ये जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप उमेश वेताळ यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये उमेश व त्याच्या पाहुण्यांत शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्या वेळेस उमेशवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. यावेळी नवले व वैराळ यांनी उमेश वेताळला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर भा.द.वि. कलम ३२६ नुसार वाढीव कलम टाकल्याचे उमेशचे म्हणणे आहे.नमूद प्रकरणी उमेशने पोलिसांना पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने, दिनांक १७ मे रोजीच्या तलवार प्रकरणात उमेश वेताळ ला गोवण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

पोलीस नाईक वैराळ ने उमेशला सांगितले कि, मागील डिसेंबर १९ च्या केसेस मध्ये तू आम्हाला पैसे दिले नाहीत. तू आमच्या कचाट्यात सापडला आहेस. आता मागील केस सह एकदम रक्कम वसूल करणार ! म्हणत, त्या केस मधून माझे नाव वगळण्यासाठी वैराळने १,००,०००/- रुपयांची मागणी केल्याने, उमेश गयावया करत होता. या लॉकडाऊनच्या काळात माझेंकडे पैसे नाहीत . थोडे फार देतो,असे म्हणत नाही/होय करत कुठेतरी ५७,०००/- रुपयांत तडजोड झाली. इसारपोटी २०,०००/- रक्कम पोलिसांना देण्यात आली.

श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे वैराळ यांनी आजपर्यंत एकूण ५७,००० / – रक्कम घेतली आहे. सदर पोलीस स्टेशन येथे अनेक सामान्यांवरती खोट्या केसेस करून, बेमाप पैसा उकळण्याचा गोरख धंदा चालू आहे. आज रक्षणकर्तेच भक्षण करायला लागलेत. हि खूप मोठी शोकांतिका आहे.असे उमेशचे मत आहे.

घेतलेले ५७,०००/- रुपये परत देण्यात यावेत, दिनांक १७ मे २०२० रोजीचा दाखल खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा, वैराळ व नवले यांची खातेनिहाय चौकशी होऊन, त्यांना बडतर्फ / निलंबनाची कारवाई करण्यात यावी.अन्यथा सोमवार दिनांक १ जून २०२० रोजी पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्व कल्पना न देता, श्रीगोंदा पोलीस स्टेशन समोर तहसील कार्यालयाच्या हद्दीत बेमुदत आमरण उपोषनास बसणार असल्याचे निवेदन उमेश वेताळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading