नो बेल डायरेक्ट जेल असा गंभीर कायदा कश्यासाठी ? – कायदे पंडित तुकाराम दरेकर .

श्रीगोंदा दिनांक २८ सप्टेंबर         

श्रीगोंदा तालुक्यातील भांनगाव व सुरोडी गावाच्या शिवेवर वास्तव्यास असणाऱ्यां संदीप काळकुश्या काळे या आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबावर, नुकताच जातीवादाचा घाला झाला . किरकोळ कारणावरून संदीप ला जनावरां सारखा मारला. त्याला का मारताय ? म्हणून, मध्ये भांडण सोडवायला गेलेल्या त्याच्या पत्नीला तर विवस्त्र होईपर्यंत किंवा विवस्त्र झाली तरीही , आरोपी जबरी मारहाण करीत असल्याचा पुरावा समोर आला . त्यानुसार माध्यमांतून बातम्या आल्या . मात्र, आलेल्या आत्याचाराच्या त्या बातम्या खोट्या आणि मंनघडन असल्याचा आरोप दिनांक २७ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या सकल मराठा ,मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रहार या संघटनेच्या नेत्यांनी केला .यांत तर काहींनी एट्रोसिटी कायद्याची गरज काय ? तो इतका गंभीर कायदा आहे की, त्यात जामीनाची सुद्धा तरतूद नाही .एकवेळस खुनाला आणि हाफ मर्डरला सुद्धा जामीन मिळतो. यात मात्र तशी तरतूद नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या आंदोलनात बोलतांना शिवप्रहार संघटनेच्या नेत्याने तर अकलेचे तारेचं तोडले आहेत .याप्रकरणी संजीव भोर यांनी आपले विचार मांडले आहेत .ते म्हणतात , मीडियाने चुकीची बातमी दाखवली व मांडली आहे .यात या आदिवासी महिलेवर अत्याचार झाला तो खोटा आहे .उलट यात वागस्कर(आरोपी ) ,यांच्याच अब्रूचे धिंडवडे काढल्याचे वक्तव्य भोर यांनी केले आहे .शिवाय याप्रकरणी पीडितांवर व त्यांना मदत करणाऱ्या वर अब्रू नुकसानीचे दावे दाखल करण्याचे आवाहन या सभेच्या निमित्ताने त्यांनी केले आहे.पीडित आदिवासी कुटुंबाच्या वतीने जर कोणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला , तर आम्हीही आंदोलन करू .त्यांनी पाच हजारांचा मोर्चा आणला तर आम्ही पन्नास हजारांचा मोर्चा आणू ,असा हक्या दमचं प्रशासन समोर भोर यांनी दिला आहे.

यानंतर बोलतांना तुकाराम दरेकर यांनी तर लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोषी असल्याचे जाहीर केले आहे .कारण एट्रोसिटी सारखे गंभीर कायदे मूठभर लोकांसाठी बनविले जातात.आणि बहुसंख्य लोकांना या कायद्याने वेठीस धरले जाते. संसदेने केलेला हा कायदा साफ खोटा असल्याचाही आरोप दरेकर यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने केला आहे.

पुढे बोलतांना दरेकर म्हणाले की ,या आदिवासी महिलेचे कपडे वारंवार का काढले जातात ? तालुक्यात दुसऱ्या बाया (महिला) नाहीत का ? याप्रसंगी, आंदोलनात खाली बसलेल्या काहींच्या बोलण्याला दुजोरा देत ती महिला सर्वात सुंदर आहे,म्हणून हे घडले. असे, म्हणत थेट दरेकर यांनी विवस्त्र करून मारहाण झालेल्या त्या महिलेच्या अब्रूचे पुन्हा धिंडवडे काढले आणि आंदोलनात एकच हशा झाला .संजीव भोर यांनी एट्रोसिटी कायदा बदलाची जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे .त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व न्याय मिळणार अशी शास्वती ही दिली.सरकार मतांवर डोळा ठेऊन कायदे बनवते. असेही ते म्हणाले .मोजून ३ ते ४ जाती कडूनचं एट्रोसिटी केली जाते .असे तुकाराम दरेकर यांचे म्हणणे आहे. काष्टी गावात काही दिवसांपूर्वी पारधी समाजाच्या महिला दारू विक्री करीत होत्या .त्यांच्यावर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांच्या समोर, कारवाई होऊ नये म्हणून, त्या महिला विवस्त्र झाल्या .यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही .अश्या प्रकाराने पोलीसही तेथून निघून आले असल्याचे दरेकरांनी नमूद केले आहे .

“नो बेल डायरेक्ट जेल” असा एट्रोसिटी कायदा .इतका गंभीर कायदा कश्यासाठी केलायं ? असा सवाल दरेकर यांनी यावेळी बोलतांना उपस्थित केला . दरेकर सरांनी केलेल्या या भाषणांत त्यांनी कायद्याच्या विषयी विशेष आणि वादळी माहिती मांडली .जसे की , संसद मतांसाठी कायदे बनविते , मोजून तीन चार जातीचं एट्रोसिटी करतात ,कायदा चुकीचा आहे ,अश्या दरेकरांनी केलेल्या विधानांनंतर काही जणांनी तर सर कायदे पंडित असल्याचीचं चर्चा केली.

वास्तविक पाहता सदर घटना अतिशय गंभीर व पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे . ही समर्थनीय नाही .घटनेतील महिला ही आदिवासी पारधी समाजाची आहे .जो समाज येथील व्यवस्थेने वेगळा आणि वंचित ठेवला होता.त्या समाजाला सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतुदी केल्या .ज्यात कलम १७ चा समावेश करन्यात आला .त्यानुसार या देशातील जात संपली असून जातीचे पालन करणे गुन्ह्यास पात्र राहील, अशी व्याख्या नमूद करण्यात आली .मात्र ! काही व्यवस्थेचे ठेकेदार आजही दलित, आदिवासी, भटके – विमुक्त समाजांवर होणाऱ्या अन्याय आत्याचारांना मानीत नाहीत . उलट दपशाहीच्या मार्गाने काही फुटीर व खरेदी केलेल्या लोकांना हाताशी धरून आरोप प्रत्यारोप करून, पीडितांना न्यायापासून वंचित ठेवतात.

या घटनेत पीडित महिलेला विवस्त्र करून मारहाण झाली किंवा मारण्याच्या भीतीने ती विवस्त्र झाली. तरी तिला मारहाण होणे कितपत संविधानिक कृत्य आहे ? हे समजणं कठीण आहे.

या आंदोलनात अनेकांनी आपले मतं मांडले आहेत. यात बाबासाहेब भोस ,घनश्याम शेलार ,संतोष इथापे, सह पीडित काळे कुटुंबाच्या विरोधात वारंवार वाद करीत असलेले, आदिवासी समाजाचे इसमही सहभागी झाले होते.

या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक जयंत कुमार मीना यांनी योग्य पद्धतीने तपास करीत दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे माध्यमांना बोलतांना सांगितले आहे.

पीडितांना न्याय मिळावा व आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे या न्यायिक भूमिकेसाठी पुरोगामी व आंबेडकरवादी संघटना आंदोलन करणार असल्याचे समजते आहे .मागावर्गीय आयोग व महिला आयोगा कडे ही तक्रार करण्यात येणार असल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे .

एट्रोसिटी कायदा आणि आदिवासी महिला विवस्त्र मारहाण प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना यांच्याशी चर्चा करतांना सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते. समवेत पोलीस उप अधीक्षक सुदर्शन मुंढे ,श्रीगोंद्या चे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आणि आदिवासी समाजाचे काही कार्यकर्ते .

(छाया -अमर घोडके)


Leave a Reply